TRENDING:

चंद्रावर हायड्रोजन सापडलं तर भारताला त्याचा फायदा कसा होईल?

Last Updated:

हायड्रोजनचा शोध भविष्यातील शोध, निरीक्षण आणि संशोधनाची दिशा ठरवू शकतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 1 सप्टेंबर:  भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचं (इस्रो) प्रज्ञान रोव्हर आपल्या उपकरणांच्या मदतीनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील नवीन माहिती शोधत आहे. जगभरातील शास्त्रज्ञांच्या नजरा इस्रोच्या या रोव्हरवर खिळल्या आहेत. आतापर्यंत प्रज्ञानला सल्फर आणि ऑक्सिजनसह एकूण नऊ रासायनिक घटकांच्या उपस्थितीचे संकेत मिळाले आहेत. इस्रोचं म्हणणं आहे की, यानंतर आता प्रज्ञान रोव्हरवरील उपकरणं चंद्रावर हायड्रोजनच्या अस्तित्वाची तपासणी करत आहेत. पण, प्रज्ञान रोव्हर चंद्रावर हायड्रोजन का शोधत आहे? असा प्रश्न अनेकांना पडण्याची शक्यता आहे. याची अनेक कारणं आहेत. तेथील हायड्रोजनचा शोध भविष्यातील शोध, निरीक्षण आणि संशोधनाची दिशा ठरवू शकतो.
चंद्राच्या दक्षिण ध्रुव
चंद्राच्या दक्षिण ध्रुव
advertisement

प्रज्ञाननं आतापर्यंत काय शोधलं आहे?

इस्रोनं म्हटलं आहे की, प्रज्ञान रोव्हरच्या लेझर इंड्युस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोपनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सिलिकॉन आणि ऑक्सिजनसह अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियम, मँगेनीजचं अस्तित्व शोधलं आहे. आता तिथे हायड्रोजनचा शोध सुरू आहे. तिथे हायड्रोजनच्या अस्तित्वाबद्दल शास्त्रज्ञ खूप आशावादी आहेत.

हायड्रोजनचा शोध का घेतला जात आहे?

चंद्राच्या पृष्ठभागावर हायड्रोजन का शोधला जात आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. यामागील कारण म्हणजे, भारताच्या चांद्रयान-1 नं 2008 साली लावलेला शोध आहे. त्यावेळी दक्षिण ध्रुवावर बर्फाच्या रूपात पाणी असल्याचं समोर आलं होतं. यामुळेच चंद्राचा दक्षिण ध्रुव जगातील सर्व अवकाश संस्थांचं आवडतं क्षेत्र बनलं आहे.

advertisement

हायड्रोजन मिळण्याची शक्यता आहे का?

केवळ चांद्रयान-1च नाही तर इतर स्त्रोतांनीदेखील उघड केलं आहे की, चंद्रावर हायड्रोजन मुबलक प्रमाणात आहे. चंद्रावर आणि दक्षिण ध्रुवावर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हायड्रोजन किती प्रमाणात आढळतो हे पाहणं बाकी आहे. त्याच भागात इस्रोच्या उपकरणांना मोठ्या प्रमाणात पाणी असल्याचं आढळलं होतं.

सध्या फक्त प्राथमिक तपास

advertisement

एक प्रश्न असाही पडतो की, प्रज्ञानवरील यंत्रांना ऑक्सिजनसह नऊ घटक सापडले आहेत, तर मग हायड्रोजन शोधण्यात वेळ का लागत आहे? याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आतापर्यंत प्रज्ञाननं मर्यादित क्षेत्रातच प्राथमिक तपास केला आहे. तपशीलवार अभ्यासात हायड्रोजन मुबलक प्रमाणात आढळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

भविष्यातील संशोधनाला मिळेल दिशा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

पाण्याच्या शोधाच्या कामात हायड्रोजनची उपस्थिती हा एक महत्त्वाचा टप्पा असेल. चंद्रावर मुबलक बर्फ असण्याचा देखील फरक पडणार नाही. हे शक्य आहे की, ऑक्सिजन आणि हायड्रोजन वेगवेगळ्या संयुगांमध्ये चंद्रावर उपस्थित असू शकतात आणि फक्त थोड्या प्रमाणात पाणी असू शकतं. अशा परिस्थितीत चंद्रावरील मोहिमांसाठी सुरू असलेल्या संशोधन कार्याची दिशा बदलू शकते. त्यामुळे नासाही या मोहिमेच्या तपासावर बारीक नजर ठेवून आहे.

advertisement

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
चंद्रावर हायड्रोजन सापडलं तर भारताला त्याचा फायदा कसा होईल?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल