TRENDING:

Dombivli Shocking : बापरे! डोंबिवलीत फोन कॉलने घेतला आगरकरांचा ताबा; पत्नीने जे पाहिलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Last Updated:

Dombivli News : डोंबिवली शहरातून एका व्यक्तीच्या पत्नीमुळे त्याची मोठ्या प्रसंगातून सुटका झाली आहे. नक्की काय घडले याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
डोंबिवली : डोंबिवली शहरातून नुकताच एक सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. स्वत:ला सीबीआय अधिकार तसेच सरकारी यंत्रणांशी संबंधित असल्याचे सांगत दोन आरोपींनी महेश आगरकर यांना धमकावत तब्बल 71 लाख रुपये हडपले आहे.
बनावट अधिकारी सांगून फसवणूक प्रकरण
बनावट अधिकारी सांगून फसवणूक प्रकरण
advertisement

जाणून घ्या घटनाक्रम

मिळालेल्या माहितीनुसार हा सर्व प्रकार मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडला आहे. तक्रारदार आगरकर यांना एका अनोळखी क्रमांकावरु फोन आला होता. त्यात फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वत:ची ओखळ ही आगरकर यांना भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणातील अधिकारी आहे अशी सांगितली आणि आगरकर यांच्या मोबाईलवरुनच काही महिलांना आक्षेपार्ह मॅसेज पाठवल्याचा आरोप केला.सध्या या प्रकरणी घाटकोर पोलिसांत तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.

advertisement

कॉल केल्यानंतर पुढं घडलं असं?

महिलांना आक्षेपार्ह मॅसेज पाठवल्या असे सांगितल्यानंतर संदीप कुमार राव यांनी आगरकर यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्या बँक खातून अनियमित अनेक व्यवहार झाल्याचाही दावा करण्यात आला तर करण शर्मा याने स्वत:ला बँकेचा कमिशन एजंड असल्याते सांगत हे प्रकरण खरं असल्याचे पटवून दिले. असे दोघांनी मिळून आगरकर यांना भिती घातली आणि कायदेशीर कारवाई होईल अशई धमकी दिली.

advertisement

पत्नीमुळे लक्षात आली फसवणुक

आगरकर यांनी आरोपींच्या दबावाखाली येत त्यांच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये तब्बल 71 लाख रुपये जमा केले. असे काही दिवस उलटून गेले अखेर आगरकर यांना संशय आला आणि त्यांनी सर्व गोष्ट पत्नीला सांगितली. नंतर आगरकर यांच्या पत्नीने आरोपींना अनेक प्रश्न विचारले मात्र समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने त्यांना हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे समजले.

advertisement

अखेर पोलिस ठाण्यात धाव

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

पत्नीच्या हुशारीमुळे आगरकर यांना हा फसवणुकीचा प्रकार समजताच त्यांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सध्या पोलिस तपास सुरु असून आरोपींचा शोघ घेण्यासाठी पोलिसांची टीम रवाना झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Dombivli Shocking : बापरे! डोंबिवलीत फोन कॉलने घेतला आगरकरांचा ताबा; पत्नीने जे पाहिलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल