TRENDING:

‘नागरिक देवो भव’ या तत्त्वावर आधारित ‘सेवा तीर्था’चे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

Last Updated:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सेवा तीर्थाचे लोकार्पण झाले. हे स्थळ कर्तव्य, करुणा, राष्ट्र प्रथम या तत्त्वांचे प्रतीक असून नागरिक देवो भव या तत्त्वाचा पुनरुच्चार झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सेवा तीर्थाचे लोकार्पण झाले. याद्वारे भारतीयांची सेवा करण्याबाबतचा त्यांच्या अढळ निर्धाराचा पुनरुच्चार आणि नागरिक देवो भव हे मार्गदर्शक तत्त्व असल्याचे ठळकपणे दिसून आले.
News18
News18
advertisement

लोकसेवेप्रतीची दृढ वचनबद्धता आणि लोककल्याण सेवा तीर्थाच्या लोकार्पणातून प्रतिबिंबीत झाल्याचे मत पंतप्रधान  मोदी यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान म्हणाले की, सेवा तीर्थ कर्तव्य, करुणा आणि राष्ट्र सर्वोपरी या तत्त्वाविषयीची वचनबद्धता यांचे लखलखीत आणि सामर्थ्यशाली प्रतीक आहे.

हे स्थळ आगामी पिढ्यांना नि:स्वार्थ सेवा आणि  सर्वांच्या कल्याणासाठी अथक प्रयत्न यांची प्रेरणा देईल तसेच प्रत्येक नागरिकाच्या कल्याणासाठी समर्पित भावनेने काम करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

advertisement

पंतप्रधानांनी ‘एक्स’  समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे,

“भारतीय नागरिकांची सेवा करण्याच्या अढळ निर्धारासह आणि नागरिक देवो भव या तत्त्वानुसार सेवा तीर्थाचे विनम्रतेने राष्ट्रार्पण केले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
50 घरं, पोलिसांची फौज आणि रात्र! बुधवार पेठेच्या दलदलीत 'त्या' रात्री काय घडलं?
सर्व पहा

हे सेवा तीर्थ कर्तव्य, करुणा, राष्ट्र प्रथम या तत्त्वाप्रतीची वचनबद्धता यांचे प्रतीक ठरावे. निस्वार्थ सेवेच्या मार्गावर चालण्याची आणि सर्वांच्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करण्याची प्रेरणा इथून मिळावी.”

advertisement

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
‘नागरिक देवो भव’ या तत्त्वावर आधारित ‘सेवा तीर्था’चे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल