आता प्रश्न असा उद्भवतो की 4K क्वालिटी, मल्टीपल स्क्रीन किंवा फॅमिली शेअरिंगशी तडजोड न करता हा खर्च 60 टक्क्यांनी कसा कमी करायचा? उत्तर असे आहे की, तुम्ही ब्रॉडबँड ओटीटी बंडलद्वारे हा खर्च कमी करू शकता.
ही एक कमाल ट्रिक आहे
प्रत्येक ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी स्वतंत्रपणे पैसे देण्याऐवजी, तुम्ही जिओ, एअरटेल आणि टाटा प्ले सारख्या आघाडीच्या टेलिकॉम आणि ब्रॉडबँड कंपन्यांकडून प्रीमियम ओटीटी सबस्क्रिप्शनसह फायबर प्लॅन खरेदी करू शकता. या प्लॅनमध्ये 10 ते 20 किंवा त्याहून अधिक स्ट्रीमिंग अॅप्स, हाय स्पीड वाय-फाय आणि अगदी लाईव्ह टीव्ही चॅनेलचा फायदा मिळतो. तुम्हाला एकाच प्लॅनमध्ये टीव्ही, इंटरनेट आणि ओटीटीपासून सर्वकाही मिळते, त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या ओटीटीवर पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही.
advertisement
ज्या YouTube वरुन लाखो कमावतात लोक! पण त्याच्या मालकाची एक दिवसाची कमाई किती?
JioFiber आणि Jio AirFiber Plans
रिलायन्स जिओकडे 599 रुपयांचा सर्वात स्वस्त ओटीटी प्लॅन आहे जो 30Mbps स्पीडसह 3.3 टीबी डेटा, 800 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल आणि 11 ओटीटी अॅप्सचा फायदा देतो.
Airtel Xstream Fiber 599 Plan
हा एअरटेल ब्रॉडबँड प्लॅन 30Mbps स्पीडसह अनलिमिटेड डेटा, 22 हून अधिक ओटीटी अॅप्स आणि 350 हून अधिक एचडी चॅनेलचा फायदा देतो.
Tata Play Fiber OTT Plan
तुम्हाला 100Mbps स्पीड असलेला प्लॅन मिळेल ज्यामध्ये अनलिमिटेड डेटा, 200 पेक्षा जास्त लाईव्ह टीव्ही चॅनेल आणि 4 ते 6 ओटीटी अॅप्स असतील. पण या प्लॅनसाठी तुम्हाला दरमहा 850 रुपये खर्च करावे लागतील.
Spam Calls ने त्रस्त आहात का? फोनची ही सेटिंग प्रॉब्लम करेल सॉल्व्ह
टीप: वेगवेगळ्या प्लॅनसाठी दरमहा 1200 पेक्षा जास्त खर्च करण्याऐवजी, तुम्ही 599 रुपयांचा प्लॅन खरेदी करणे चांगले. अशा परिस्थितीत, ब्रॉडबँड ओटीटी बंडल प्लॅनद्वारे एकूण 6 ते 10 हजार रुपयांची बचत शक्य आहे. परंतु लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राइमचा फायदा स्वस्त प्लॅनमध्ये उपलब्ध नाही. जिओ, एअरटेल आणि टाटा प्लेच्या या प्लॅनसह, तुम्हाला जीएसटी चार्ज देखील स्वतंत्रपणे भरावे लागेल.
