TRENDING:

आटपाडी जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 : आटपाडीतील विजयी उमेदवारांची यादी, कुणी उधळला गुलाल?

Last Updated:

Sangli Aatpadi ZP election result 2026 : निंबवडे गटामध्ये एक अत्यंत हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत असून, तिथे गोपीचंद पडळकर यांच्या भावजय माधवी पडळकर (भाजप) मैदानात आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Sangli Aatpadi ZP Election Result 2026: आटपाडी तालुक्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुराळा उडाला असून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण 4 गट असून, त्यांत होणाऱ्या चुरशीच्या लढतींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ७ फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या मतदानानंतर, आज म्हणजेच 9 फेब्रुवारीला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून सत्तेची गणिते स्पष्ट होतील.
Sangli Aatpadi  ZP election result
Sangli Aatpadi ZP election result
advertisement

निंबवडे गटामध्ये एक अत्यंत हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत असून, तिथे गोपीचंद पडळकर यांच्या भावजय माधवी पडळकर (भाजप) मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाने विद्या मोटे यांना उमेदवारी देऊन मोठे आव्हान दिले आहे. पडळकर घराण्याची प्रतिष्ठा या गटात पणाला लागली असून, मतदारांचा कौल कोणाकडे जातो, यावर भाजपचे तालुक्यातील भवितव्य अवलंबून आहे.

advertisement

हेही वाचा: महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक निकाल २०२६ चे लाईव्ह अपडेट्स

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मानव संस्कृतीचे दुर्मिळ पुरावे, डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागात अनोखा ठेवा
सर्व पहा

आज सकाळी 10 वाजल्यापासून आटपाडी येथे मतमोजणीला सुरुवात झाली असून, कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तालुक्यातील 4 गट आणि 8 गणांचा निकाल दुपारपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पडळकर आणि देशमुख यांच्या गटाची सत्ता कायम राहते की तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गट मुसंडी मारतो, याचा फैसला आता काही क्षणांतच होईल.

advertisement

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
आटपाडी जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 : आटपाडीतील विजयी उमेदवारांची यादी, कुणी उधळला गुलाल?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल