TRENDING:

केवळ एक महिना मिळतं पण अनेक फायदे देतं, एकदातरी खा 'हे' फळ

Last Updated:

लालसर आकर्षक रंग, मोहक सुगंध आणि स्वादिष्ट चव अशी तिची ओळख. तिच्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मोहित शर्मा, प्रतिनिधी
लिची हे एक रसाळ फळ आहे. यात 80% पाणी असतं.
लिची हे एक रसाळ फळ आहे. यात 80% पाणी असतं.
advertisement

करौली, 21 सप्टेंबर : बाजारात अनेक हंगामी फळं आली आहेत. ज्याचा आपण पुरेपूर आस्वाद घेतच असाल, आता यात लिचीचादेखील समावेश करा. कारण उन्हाळ्यात लिची खाणं आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. या फळापासून मिळणारे फायदे अनेक आहेत. लालसर आकर्षक रंग, मोहक सुगंध आणि स्वादिष्ट चव अशी लिचीची ओळख. लिचीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळेच ते शरीर थंड ठेवतं. परंतु राजस्थानच्या करौली जिल्ह्यात पाहिलं तर या फळाचा मोठा तुटवडा दिसून येतो, याठिकाणी हे फळ उपलब्ध नसतं म्हणून नाही, तर त्याबाबत लोकांना पुरेशी माहिती नाहीये म्हणून.

advertisement

करौलीमध्ये देहरादूनची लिची विकली जाते. विशेष म्हणजे येथे केवळ एकाच दुकानात हे फळ मिळतं, तरीही त्याचा हवा तसा खप होत नाही. कारण लोकांना अजूनही हे लालचुटुक फळ नेमकं आहे काय? याबाबत माहिती नाहीये आणि त्याचे उपयोगही माहित नाही आहेत.

'या'ठिकाणी एका दिवसात तयार होतात 1 लाख मोदक!

करौलीचे एकमेव लिची व्यापारी अब्दुल खान यांनी सांगितलं की, आम्ही आग्र्याहून देहरादूनला लिची घेऊन येतो आणि करौलीमध्ये विकतो. हे फळ केवळ सव्वा ते एक महिना उपलब्ध असतं. त्याचा थंडगारपणा हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. यावर्षी आम्ही लिची 200 रुपये किलो दराने विकतोय. परंतु लोकांना याबाबत जास्त माहिती नसल्यामुळे दररोज केवळ 50 ते 60 किलो एवढीच विक्री होत आहे.

advertisement

मोसंबी फळबाग शेतकऱ्यांसाठी वरदान, पाहा कसं करावं बागेचं नियोजन?

दरम्यान, लिची हे एक रसाळ फळ आहे. यात 80% पाणी असतं. ज्यामुळे आपलं शरीर हायड्रेट राहण्यास मदत मिळते. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढून लिची शरीराला ऊर्जा प्रदान करते. लिचीच्या सेवनामुळे संसर्गजन्य आजार आपल्यापासून दूर राहतात. जसे की, घसा खवखवणे, सर्दी, ताप. लिची त्वचेसाठीदेखील उपयुक्त ठरते. तिच्या सेवनामुळे त्वचा चमकदार होते. त्याचबरोबर लिची हृदयासाठीदेखील खूप लाभदायी आहे. यात भरपूर प्रमाणात पोटॅशियम असतं, जे हृदय निरोगी ठेवतं. लिचीच्या सेवनाने प्रतिकार शक्तीदेखील वाढते. गरोदर महिलांनी लिचीचं आवर्जून सेवन करावं. यामध्ये असलेलं लोह त्यांच्यासाठी उपयुक्त असतं. लिचीचं सेवन केल्याने अर्धांगवायूचा धोकाही कमी होतो.

advertisement

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
केवळ एक महिना मिळतं पण अनेक फायदे देतं, एकदातरी खा 'हे' फळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल