मोसंबी फळबाग शेतकऱ्यांसाठी वरदान, पाहा कसं करावं बागेचं नियोजन?

Last Updated:

मोसंबी फळबागाची शेती करताना लागवडीपासून ते काढणीपर्यंत नेमकी काय काळजी घेतली पाहिजे जाणून घ्या.

News18
News18
बीड, 21 सप्टेंबर : शेतीला आधुनिकतेची जोड देत सध्याच्या घडीला बहुतांश शेतकरी फळबागाची शेती करत आहेत. परंतु योग्य नियोजन आणि वातावरणात होणारा बदल यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे मोसंबी फळबागाची शेती करताना लागवडीपासून ते काढणीपर्यंत नेमकी काय काळजी घेतली पाहिजे. सततच्या वातावरणातील बदलामुळे मोसंबी फळबागावर नव्याने पडणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे याबद्दलच बीडमधील कृषी अभ्यासक रामेश्वर चंडक यांनी माहिती दिली आहे.
मागील दोन वर्षांपासून मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मोसंबीच्या लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बाजारपेठेत मोसंबीला मोठ्या प्रमाणात मिळणारा दर व इतर बाबींमुळेच आता अनेक शेतकरी मोसंबी लागवडीकडे वळत आहेत. मात्र, ही मोसंबीची लागवड करताना योग्य ती काळजी घेण्याची गरज असते.
30 गुंठे मिरचीतून लाखोंची कमाई; शेतकऱ्यानं कशी साधली किमया?
मोसंबीची लागवड करण्याच्या अनेक पद्धती आहेत. सध्या मात्र कृषी क्षेत्रातल्या नियमाप्रमाणे 20×20 अंतरावर मोसंबीची लागवड करणे योग्य आहे. 20×20 अंतरावर लागवड केल्यास एकरी 210 झाडे एकूण बसतात. झाडाला जास्त कालावधीसाठी उत्पादनशील ठेवायचा असेल तर 20×20 अंतरावरच लागवड करणे योग्य आहे. मोसंबीच्या झाडाच्या जातीची निवड करताना सालगुडी, न्युसेलर याच जातींची निवड करावी कारण या सर्वोत्तम आणि अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती आहेत.
advertisement
मोसंबी कलमे प्रत्यक्ष लावलेल्या जागेवर घ्यावे. कलमे सरळ वाढलेली जोमदार वाढलेली आणि ताजे असावी. कलमे ही रोगमुक्त आणि बुरशी लागलेली नसावी. कलमांची उंची ही जमिनीपासून 2 ते 3 फूट असावी. डोळा लावलेला भाग हा जमिनीपासून 23-30 सेमी उंच असावा. मोसंबीची कलमे सरकारी किंवा नोंदणीकृत रोप वाटिकेतून खरेदी करावीत.
advertisement
मोसंबीसाठी पाणी व्यवस्थापन
ठिबक पद्धतीने मोसंबीच्या झाडांना पाणी व खते दिल्यास अधिक फायदेशीर ठरते. पावसाळ्यात पाऊसाचा खंड पडल्यास 13 दिवसातून एकदा पाणी द्यावे. हिवाळ्यात 11 ते 14 दिवसाने पाणी द्यावे. उन्हाळ्यात 6 ते 11 दिवसाच्या फरकाने पाणी द्यावे.
मोसंबी खत व्यवस्थापन
1 ते 4 वर्षापर्यंत मोसंबीच्या प्रति झाडासाठी खालील प्रमाणे रासायनीक खते द्यावीत.
advertisement
1ले वर्ष – 125 ग्रॅम: 125 ग्रॅम: 125 ग्रॅम (नत्र:स्‍फूरद:पालाश)
2ले वर्ष – 250 ग्रॅम: 250 ग्रॅम:250 ग्रॅम (नत्र:स्‍फूरद:पालाश)
3रे वर्ष – 500 ग्रॅम: 250 ग्रॅम:250 ग्रॅम (नत्र:स्‍फूरद:पालाश)
4थे वर्ष – 500 ग्रॅम: 250 ग्रॅम:250 ग्रॅम (नत्र:स्‍फूरद:पालाश)
मराठी बातम्या/कृषी/
मोसंबी फळबाग शेतकऱ्यांसाठी वरदान, पाहा कसं करावं बागेचं नियोजन?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement