जालनाच्या शेतकऱ्याची कमाल, मोसंबीतून मिळवलं 14 लाखांचं उत्पन्न! पाहा फॉर्म्युला

Last Updated:

जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मोसंबी शेतीमधून तब्बल 14 लाखांचे उत्पन्न मिळवलं आहे.

News18
News18
जालना, 15 सप्टेंबर : आर्थिक फायदा मिळवण्यासाठी शेतकरी आता वेगवेगळे प्रयोग करत आहे. दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यातील शेतकरी देखील यामध्ये मागे नाही. जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मोसंबी शेतीमधून तब्बल 14 लाखांचे उत्पन्न मिळवलं आहे. घनसावंगी तालुक्यातील पणेवडीच्या मनोज चव्हाण यांनी ही कामगिरी केलीय. सध्या त्यांच्या झाडावर 70 ते 80 टन माल असून यंदा यापासून 17 ते 18 लाख उत्पन्न होईल अशी अपेक्षा त्यांना आहे.
जालना जिल्ह्यातील पानेवाडीचे मनोज चव्हाण आणि त्याचे बंधू उद्धव चव्हाण यांची 30 एकर शेती आहे. यापैकी सात एकर क्षेत्रावर त्यांनी 1200 मोसंबी बागेची लागवड केली आहे लागवड केल्यानंतर या झांडांना योग्य खत मात्रा देऊन त्यांचा सांभाळ केला. चार वर्षानंतर त्यांना यापासून मोसंबीचे उत्पन्न सुरू झाले.  त्यांनी मागच्या वर्षी आंबिया बहरची 55 टन मोसंबी 25 हजार रुपये प्रति टन या दराने विकली यातून त्यांना 14 लाख रुपयांचे उत्पन्न झाले. तर सध्या त्यांच्या मोसंबी बागेत 70 ते 80 टन मोसंबी असून यातून त्यांना 17 ते 18 लाख रुपये उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे.
advertisement
ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मोसंबी तोड झाल्यानंतर ते वाळलेल्या फांद्यांची छाटणी करतात. त्यानंतर डीएपी आणि सुक्ष अन्नद्रव्ये असणाऱ्या खतांचा बेसल डोस झाडाला प्रति झाड सव्वा ते दीड किलो दिला जातो. पिकावर असलेल्या कीटक नुसार दोन ते तीन फवारण्या ते घेतात. तसेच उन्हाळ्यात शेणखताची मात्रा देखील झाडांना दिली जाते. अशा पद्धतीने योग्य नियोजन करून पानेवाडीचे मनोज चव्हाण मोसंबी बागेतून मोठे आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत.
advertisement
इतर शेतकऱ्यांनी मोसंबी पिकाची लागवड करावी. योग्य नियोजन करून झाडांची काळजी घ्यावी. मोसंबी पिकाचे योग्य व्यवस्थापन केलं तर या पिकातून आपण चांगले उत्पादन घेऊ शकतो, असा अनुभव चव्हाण यांनी सांगितला.
advertisement
मराठी बातम्या/कृषी/
जालनाच्या शेतकऱ्याची कमाल, मोसंबीतून मिळवलं 14 लाखांचं उत्पन्न! पाहा फॉर्म्युला
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement