advertisement

Mumbai News: बदलापूरनंतर आता मुंबई हादरली! मालाडमधील शाळेत ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, शिपायासह शाळेच्या CEO ला अटक

Last Updated:

Mumbai Crime News: बदलापूर प्रकरणाची जखम ताजी असतानाच, मुंबईतील मालाड परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.

बदलापूरनंतर आता मुंबई हादरली! मालाडमधील शाळेत ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, शिपायासह शाळेच्या CEO ला अटक
बदलापूरनंतर आता मुंबई हादरली! मालाडमधील शाळेत ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, शिपायासह शाळेच्या CEO ला अटक
मुंबई: बदलापूर प्रकरणाची जखम ताजी असतानाच, मुंबईतील मालाड परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शाळेतील ३५ वर्षीय शिपायाने चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी शाळेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यालाही (CEO) बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १२ जानेवारी रोजी घडली होती. नराधम शिपायाने पीडित मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार केला होता. घाबरलेल्या मुलीने सुरुवातीला कोणालाही काही सांगितले नाही, मात्र अलीकडेच तिने धीर धरून पालकांना या आपबितीबद्दल माहिती दिली. त्यानंतर पालकांनी तातडीने ६ फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
advertisement

शाळेच्या प्रशासनाकडून धमकावण्याचा प्रयत्न?

या प्रकरणात शाळा प्रशासनाची भूमिका संशयास्पद आणि संतापजनक राहिली आहे. पीडित मुलीच्या पालकांनी आरोप केला आहे की, ही बाब समजल्यानंतर शाळेचे सीईओ अनंत यज्ञीवा यांनी पोलिसांत न जाण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला. शाळेची बदनामी होईल, या भीतीने पालकांना धमकावून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला.

आरोपींची माहिती आणि कारवाई

advertisement
पोलिसांनी याप्रकरणी दोन मुख्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शाळेचा शिपाई मुख्य आरोपी अनिल पांचाळ (३०) आणि शाळेचा सीईओ अनंत यज्ञीवा (६५) या दोघांना अटक करण्यात आली आहे. घटनेची माहिती लपवणे आणि पालकांना धमकावणे या आरोपात शाळेच्या सीईओ विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
दोघांविरुद्ध BNS कलम ७४, ३५१ (२) आणि पोक्सो (POCSO) कायदा कलम १०, १७, २१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
advertisement

पालकांमध्ये संतापाची लाट

शाळेसारख्या सुरक्षित ठिकाणी अशा घटना घडत असल्याने पालकांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण आहे. "अशा नराधमांना कठोर शासन व्हावे आणि गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या शाळेची मान्यता रद्द करावी," अशी मागणी मालाडमधील स्थानिक नागरिकांनी केली आहे.

पुढील तपास सुरू

पोलीस सध्या शाळेतील CCTV फुटेज आणि कर्मचाऱ्यांच्या नोंदींची तपासणी करत आहेत. तसेच, शाळा व्यवस्थापनातील इतर कोणाचा या दडपशाहीत सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: बदलापूरनंतर आता मुंबई हादरली! मालाडमधील शाळेत ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, शिपायासह शाळेच्या CEO ला अटक
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement