Aajache Rashibhavishya : महादेवाची विशेष कृपा होणार, सोमवारी नशीब पालटणार, फक्त ही चूक टाळा, पाहा राशीभविष्य
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
आजचा दिवस काही राशींसाठी अतिशय खास असणार आहे. महादेवाची विशेष कृपा या राशीवर होणार आहे.पुण्यातील ज्योतिषी अशोक पाटील यांनी मेष ते मीन राशींचं आजचं राशीभविष्य सांगितलं आहे.
advertisement
1/13

मेष राशीच्या व्यक्तींवर आज महादेवांची विशेष कृपादृष्टी राहील. आज तुमचे ग्रहमान चांगले असल्यामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. चंद्राचा प्रभावी योग तयार होत आहे. तसेच तुमच्या कामाचे कौतुकही होईल.
advertisement
2/13
वृषभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे.आज काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कुटुंबीयांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. एकूणच आजचा दिवस तुमचा समाधानकारक असणार आहे.
advertisement
3/13
मिथुन राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस कामाच्या दृष्टीने चांगला जाऊ शकतो. कामामध्ये नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. मित्रांकडून सहकार्य मिळेल.
advertisement
4/13
कर्क राशीच्या लोकांसाठी सोमवारचा दिवस कामाच्या दृष्टीने अनुकूल असणार आहे. मेहनत घेतलेले प्रोजेक्ट व्यवस्थित पूर्ण होतील आणि तुम्हाला क्रिएटीव्ह काम करण्याची संधी मिळेल. काम करत असताना तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष द्या.
advertisement
5/13
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असणार आहे. तुमची प्रलंबित कामे आज पूर्ण होतील कामात प्रगती होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस काहीसा व्यस्त असणार आहे. एखाद्या मंगलमय कार्यात सहभागी होणार आहात.
advertisement
6/13
कन्या राशीसाठी आजचा दिवस मिश्र स्वरूपाचा राहू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची मदत करावी लागू शकते. ग्रहयोगानुसार वाद होण्याची शक्यता आहे.त्यामुळे कोणासोबत वाद होणार नाही यांची काळजी घ्या.
advertisement
7/13
तुळ राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे. तसेच नवीन योजना सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल ठरू शकतो. त्यामुळे तुम्हाला नवीन काही सुरुवात करण्याची असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे .
advertisement
8/13
वृश्चिक राशीच्या व्यक्तीसाठी आज कामाच्या ठिकाणी काही आव्हाने येऊ शकतात. संयम आणि शहाणपणाने निर्णय घेतल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे. नोकरी किंवा व्यवसायात काही नवीन बदल केल्यास फायदा होईल.
advertisement
9/13
धनु राशीसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे आज तुम्हाला फायद्याबरोबर तोटा ही सहन करावा लागणार असल्याने आज तुम्हाला सावध राहावे गरजेचं आहे. कामांव्यतिरिक्त तुम्ही इतर गोष्टीही कराल.
advertisement
10/13
मकर राशीसाठी सोमवारचा दिवस अनुकूल असणार आहे. भागीदारीत केलेल्या व्यवसायातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. घरातील कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आज कामात थोडा ताण जाणवू शकतो. मात्र संयम ठेवून काम केल्यास यश मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
11/13
कुंभ राशीच्या व्यक्तीचा आजचा दिवस हा व्यस्त राहणार आहे. काही प्रमाणात कामाचा ताण ही जाणवू शकतो.त्यामुळे कामच नियोजन करा. आज तुमच्या कल्पनांना योग्य दिशा मिळू शकते. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे.
advertisement
12/13
आजचा दिवस मीन राशीसाठी सकारात्मक राहणार आहे. कामात योग्य जोखीम घेतल्यास फायदा मिळण्याची संधी आहे. जुने प्रोजेक्ट पूर्ण होण्याची शक्यता असून, नवीन संधीदेखील समोर येऊ शकतात. आर्थिक बाबतीत संयम ठेवल्यास फायदा होईल.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya : महादेवाची विशेष कृपा होणार, सोमवारी नशीब पालटणार, फक्त ही चूक टाळा, पाहा राशीभविष्य