ज्याची भीती तेच घडणार! बाबा वेंगांच्या 'या' भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या तर शेवट निश्चित, नेमकं काय घडणार?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
बल्गेरियाच्या जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्यांनी नेहमीच जगाला थक्क केले आहे. त्यांची अनेक भाकिते खरी ठरली आहेत. आता 2026 हे वर्ष जवळ येत असताना, त्यांनी या वर्षासाठी केलेल्या काही धक्कादायक भविष्यवाण्यांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
1/7

बल्गेरियाच्या जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्यांनी नेहमीच जगाला थक्क केले आहे. 9/11 चा हल्ला असो वा त्सुनामी, त्यांची अनेक भाकिते खरी ठरली आहेत. आता 2026 हे वर्ष जवळ येत असताना, त्यांनी या वर्षासाठी केलेल्या काही धक्कादायक भविष्यवाण्यांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. बाबा वेंगा यांच्या मते, 2026 हे वर्ष मानवजातीसाठी आणि पृथ्वीसाठी अत्यंत परिवर्तनकारी आणि आव्हानात्मक ठरणार आहे.
advertisement
2/7
तिसरे महायुद्ध : बाबा वेंगा यांच्या दाव्यानुसार, 2026 मध्ये जगाच्या पूर्व भागात एका मोठ्या युद्धाची ठिणगी पडेल. हे युद्ध हळूहळू संपूर्ण जगात पसरून 'तिसऱ्या महायुद्धाचे' रूप घेऊ शकते. यामध्ये अमेरिका आणि युरोपसारख्या पाश्चात्य देशांना मोठ्या विनाशाचा सामना करावा लागेल, असे संकेत त्यांनी दिले आहेत.
advertisement
3/7
एलियन्सशी प्रथम संपर्क : 2026 मधील सर्वात रोमांचक आणि भीतीदायक भविष्यवाणी म्हणजे दुसऱ्या ग्रहावरील जीवांचा पृथ्वीशी संपर्क. नोव्हेंबर 2026 मध्ये एखादे विशाल अंतराळ यान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल आणि मानव पहिल्यांदाच परग्रहावरील लोकांशी संवाद साधेल, असे भाकीत बाबा वेंगा यांनी केले आहे.
advertisement
4/7
भीषण नैसर्गिक आपत्ती: पर्यावरणाच्या दृष्टीने 2026 हे वर्ष विनाशकारी ठरू शकते. पृथ्वीच्या 7 ते 8 टक्के भूभागावर भीषण भूकंप, महापूर आणि ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान बदलामुळे निसर्गाचे संतुलन बिघडेल आणि अनेक शहरे पाण्याखाली जाऊ शकतात.
advertisement
5/7
जागतिक आर्थिक संकट: बँकिंग व्यवस्थेचे कोलमडणे आणि चलनाचे मूल्य कमी होणे यामुळे 2026 मध्ये जगात मोठे आर्थिक संकट येईल. डिजिटल आणि फिजिकल करन्सीमध्ये अस्थिरता निर्माण होऊन महागाई गगनाला भिडेल, ज्यामुळे सामान्य जनतेमध्ये असंतोष पसरेल.
advertisement
6/7
कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) धोका: तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात 2026 मध्ये 'एआय' मानवी नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता आहे. यंत्रे मानवाच्या निर्णय प्रक्रियेवर ताबा मिळवू शकतात आणि यामुळे रोजगाराच्या संधी कमी होऊन जगभरात अनिश्चितता निर्माण होईल, असा इशारा बाबा वेंगा यांनी दिला आहे.
advertisement
7/7
आशिया आणि चीनचे वर्चस्व: जागतिक राजकारणात मोठी सत्तांतरे होतील. 2026 मध्ये अमेरिका आणि पाश्चात्य देशांचे वर्चस्व कमी होऊन आशियाई देश, विशेषतः चीन, जगातील नवीन 'सुपरपॉवर' म्हणून उदयास येईल. रशियामध्ये देखील एका सामर्थ्यशाली नेत्याचा उदय होईल जो जगाचे राजकारण बदलेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
ज्याची भीती तेच घडणार! बाबा वेंगांच्या 'या' भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या तर शेवट निश्चित, नेमकं काय घडणार?