TRENDING:

अडचणी वाढणार! शनी-राहू-केतू 'या' 2 राशींच्या लोकांच्या आयुष्यात आणणार वादळ, तुमची रास तर नाही ना यात?

Last Updated:
2026 मध्ये शनी, राहू, केतू यांची युती या दोन राशींच्या लोकांच्या आयुष्यात वाढवणार आव्हान. आर्थिक, मानसिक आणि नात्यातील संघर्ष वाढू शकतो. मोठ्या निर्णयात सावधगिरी बाळगणे महत्वाचे ठरेल.
advertisement
1/7
अडचणी वाढणार! शनी-राहू-केतू 'या' 2 राशींच्या लोकांच्या आयुष्यात आणणार वादळ
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून 2026 हे वर्ष अत्यंत उलथापालथीचे ठरणार आहे. या वर्षात शनी, राहू आणि केतू या तीनही क्रूर मानल्या जाणाऱ्या ग्रहांची स्थिती काही राशींसाठी 'अग्निपरीक्षा' घेणारी ठरेल. विशेषतः सिंह आणि कुंभ या दोन राशींच्या लोकांसाठी हे वर्ष अतिशय सावधगिरीने पाऊल टाकण्याचे आहे. शनीची साडेसाती, ढैय्या आणि राहू-केतूचे संक्रमण यामुळे या राशींच्या आयुष्यात मोठे वादळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
2/7
कुंभ रास - साडेसातीचा अंतिम टप्पा: कुंभ राशीच्या लोकांसाठी 2026 मध्ये शनीच्या साडेसातीचा तिसरा आणि अंतिम टप्पा सुरू असेल. शनी या काळात मीन राशीत असल्याने कुंभ राशीच्या लोकांना मानसिक तणाव आणि आर्थिक ओढाताण जाणवू शकते. कामात विनाविलंब यश मिळणे कठीण जाईल.
advertisement
3/7
सिंह रास - शनीची ढैय्या: सिंह राशीवर 2026 मध्ये शनीची ढैय्या सुरू राहणार आहे. शनीची वक्रदृष्टी या राशीवर असल्याने कोर्ट-कचेरीचे व्यवहार, कौटुंबिक कलह आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. कष्टाचे फळ मिळण्यास उशीर होईल.
advertisement
4/7
राहू-केतूचे भयावह संक्रमण: 2026 मध्ये राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत असणार आहेत. 5 डिसेंबर 2026 पर्यंत ही स्थिती कायम राहील. राहू कुंभ राशीत असल्याने भ्रमिष्ट होणे, चुकीचे निर्णय घेणे आणि फसवणूक होण्याचे योग आहेत. तर केतू सिंह राशीत असल्याने आत्मविश्वासात घट आणि गूढ आजार सतावू शकतात.
advertisement
5/7
आर्थिक संकटाची आणि गडबडीची शक्यता: ज्योतिषाचार्यांच्या मते, सिंह आणि कुंभ राशीच्या लोकांनी या वर्षात मोठी गुंतवणूक करणे टाळावे. शेअर मार्केट किंवा व्यवसायात भागीदारी करताना फसवणूक होऊ शकते. मोठे आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.
advertisement
6/7
करिअर आणि नात्यात संघर्ष: या काळात ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी किंवा वरिष्ठांशी वाद होऊ शकतात. विवाहित लोकांच्या आयुष्यात जोडीदाराशी मतभेद वाढू शकतात. रागावर नियंत्रण न ठेवल्यास वर्षभर मानसिक शांतता भंग पावेल.
advertisement
7/7
ग्रहमान अनुकूल नसले तरी संयम आणि कर्माच्या बळावर संकटांची तीव्रता कमी करता येते. 2026 मध्ये सिंह आणि कुंभ राशीच्या जातकांनी घाईत कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
अडचणी वाढणार! शनी-राहू-केतू 'या' 2 राशींच्या लोकांच्या आयुष्यात आणणार वादळ, तुमची रास तर नाही ना यात?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल