TRENDING:

₹8.80 लाखांच्या या 7-सीटर MPV साठी शोरुममध्ये रांगा! देते 26.11 km मायलेज

Last Updated:
Maruti Suzuki Ertiga गेल्या महिन्यातील सर्वात जास्त विकली जाणारी 7-सीटर कार ठरली आहे. कंपनी या कारला फक्त 8.80 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स शोरुम किंमतीत विकते. ही कार 7-सीटर लेआउट, ड्यूअल-टोन डॅशबोर्ड, सॉफ्ट-टच मटेरियल, 7-इंच टचस्क्रिन इंफोटेनमेंट (अँड्रॉइड ऑटो/अॅपल कारप्ले), ऑटोमॅटिक क्लायमेंट कंट्रोल, रियर एसी वेंट्ससह येते. यात सेफ्टीसाठी स्टँडर्ड 6 एयरबॅग मिळतात.
advertisement
1/9
₹8.80 लाखांच्या या 7-सीटर MPV साठी शोरुममध्ये रांगा! देते 26.11 km मायलेज
मोठी कुटुंबे नेहमीच 7-सीटर कारकडे आकर्षित होतात. गेल्या महिन्याच्या विक्रीतूनही हे स्पष्ट झाले. जानेवारी 2026 मध्ये मारुती सुझुकी एर्टिगा ही सर्वाधिक विक्री होणारी 7-सीटर कार होती, तर महिंद्रा बोलेरो आणि महिंद्रा स्कॉर्पिओची विक्रीही वाढली. मॉडेलनुसार विक्री रिपोर्टवर एक नजर टाकूया.
advertisement
2/9
या लिस्टमध्ये मारुती एर्टिगा पहिल्या नंबरवर आहे. या 7-सीटर एसयूव्हीने गेल्या महिन्यात 17,892 नवीन ग्राहक जोडले. जानेवारी 2025 मध्ये विकल्या गेलेल्या 14,248 युनिट्सच्या तुलनेत हा आकडा वर्षानुवर्षे 26 टक्के लक्षणीय वाढ दर्शवतो. ती फक्त ₹8.80 लाख (एक्स-शोरूम) या सुरुवातीच्या किमतीत विकली जाते.
advertisement
3/9
Maruti Suzuki Ertigaची फीचर्स आणि इंजिन : मारुती एर्टिगाचे इंटीरियर स्पेसियस आणि प्रीमियम आहे. यात 7-सीटर लेआउट, ड्युअल-टोन डॅशबोर्ड, सॉफ्ट-टच मटेरियल, 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम (अँड्रॉइड ऑटो/अ‍ॅपल कारप्ले), ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रिअर एसी व्हेंट्स आणि क्रूझ कंट्रोल आहे. सुरक्षा फीचर्समध्ये सहा एअरबॅग्ज (टॉप व्हेरिएंट), EBD सह ABS, ESP, हिल होल्ड आणि ISOFIX यांचा समावेश आहे.
advertisement
4/9
याचा 1.5L K-सीरीज पेट्रोल इंजिन (103 bhp) CNG ऑप्शनमध्येही उपलब्द आहे. जी स्मूद परफॉर्मेंससही देते. मायलेज ARAI नुसार पेट्रोलमध्ये 20.3-20.51 kmpl आणि CNG मध्ये 26.11 km/kg पर्यंत आहे. जी फॅमिली वापरासाठी एक परवडणारा ऑप्शन बनते.
advertisement
5/9
Mahindra Scorpio : मारुती स्कॉर्पिओ यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यात तिने 15,542 नवीन ग्राहक जोडले. जानेवारी 2025 मध्ये विकल्या गेलेल्या 15,442 युनिट्सच्या तुलनेत ही आकडेवारी वर्षानुवर्षे 1 टक्के वाढ दर्शवते.
advertisement
6/9
Mahindra Bolero : विक्रीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर बोलेरो आहे. या कारला गेल्या महिन्यात 11,841 नवीन ग्राहक मिळाले. हा आकडा जानेवारी 2025 मध्ये सेल केलेल्या याच्या एकूण 8,682 यूनिटच्या तुलनेत वार्षिक स्तरावर आलेली 36 टक्के वाढ दर्शवतो.
advertisement
7/9
Mahindra XUV 7X0 : महिंद्रा XUV7XO लाँच झाल्यापासूनच तिने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. गेल्या महिन्यात तिला एकूण 10,133 नवीन ग्राहक मिळाले. नुकत्याच लाँच झालेल्या वाहनासाठी ही कामगिरी खूपच प्रभावी आहे.
advertisement
8/9
Toyota Innova : सले कमी होऊनही टोयोटा इनोवा टॉप-5 च्या लिस्टमध्ये पोहोचली आहे. या गाडीला गेल्या महिन्यात एकूण 9,455 नवीन ग्राहक मिळाले. हा आकडा जानेवारी 2025 मध्ये सेल केलेल्या याच्या एकूण 9,780 यूनिटच्या तुलनेत वार्षिक स्तरावर आलेल्या 3 टक्क्यांची घसरण दर्शवतो.
advertisement
9/9
वर उल्लेख केलेल्या 7-सीटर सेगमेंटमधील टॉप-5 कार व्यतिरिक्त, गेल्या महिन्यात किआ कॅरेन्सच्या 5,633 यूनिट, Maruti Suzuki XL6च्या 3,820 युनिट्स, टोयोटा फॉर्च्युनरच्या 3,046 युनिट्स, रेनॉल्ट ट्रायबरच्या 2,509 युनिट्स आणि टाटा सफारीच्या 2,375 युनिट्सची विक्री झाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
₹8.80 लाखांच्या या 7-सीटर MPV साठी शोरुममध्ये रांगा! देते 26.11 km मायलेज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल