'जे पाकिस्तानला जमलं नाही, ते भारताने करून दाखवलं!', 'रहमान डकैत'च्या मित्राने केलं बॉलीवूडचं कौतुक, म्हणाला...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dhurandhar Movie: ज्या 'रहमान डकैत'च्या 'धुरंधर' चित्रपटातील भूमिकेवरून वाद सुरू होता, त्याच डकैतच्या खऱ्या आयुष्यातील मित्राने बॉलीवूडला चक्क 'थँक यू' म्हटलंय!
advertisement
1/9

मुंबई: सध्या बॉक्स ऑफिसवर एकाच नावाचा धुमाकूळ सुरू आहे आणि ते नाव म्हणजे आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर'. रणवीर सिंगचा स्वॅग आणि अक्षय खन्नाचा थरकाप उडवणारा अभिनय पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत.
advertisement
2/9
पण या चित्रपटाची चर्चा आता केवळ थिएटरपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती थेट पाकिस्तानच्या गल्लीबोळापर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे, ज्या 'रहमान डकैत'च्या भूमिकेवरून वाद सुरू होता, त्याच डकैतच्या खऱ्या आयुष्यातील मित्राने बॉलीवूडला चक्क 'थँक यू' म्हटलंय!
advertisement
3/9
कराचीतील लियारी या गँगवॉरसाठी कुख्यात असलेल्या भागात एकेकाळी रहमान डकैतचं राज्य होतं. याच रहमानचा जवळचा मित्र आणि व्यवसायाने वकील असलेले हबीब जान बलूच यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरतोय. हबीब जान यांनी हा चित्रपट चक्क दोनदा पाहिला आहे.
advertisement
4/9
त्यांनी व्हिडिओमध्ये अत्यंत खळबळजनक विधान केलंय. हबीब म्हणतात, "जे काम पाकिस्तानला आजवर जमलं नाही, ते बॉलीवूडने करून दाखवलंय. मी बॉलीवूडचे मनापासून आभार मानतो." त्यांच्या या विधानाचा रोख असा होता की, ज्या रहमानला पाकिस्तानने केवळ गुन्हेगार मानलं, त्याला बॉलीवूडने जगाच्या नकाशावर आणलं.
advertisement
5/9
हबीब जान यांच्या मते, चित्रपटात अक्षय खन्नाने साकारलेला रहमान हा व्हिलन नसून त्यांच्यासाठी तो हिरो होता. ते म्हणतात, "पाकिस्तान रहमानचा ऋणी आहे. जर रहमान आणि उजैर बलूच नसते, तर आज पाकिस्तानची अवस्था बांगलादेशपेक्षाही वाईट झाली असती."
advertisement
6/9
बलूच राष्ट्रवादाचे समर्थक असलेले हबीब गेल्या दोन दशकांपासून रहमानचे मित्र होते. त्यांच्या या दाव्यामुळे आता 'धुरंधर'मधील पात्रांच्या सत्यतेबद्दल सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत.
advertisement
7/9
'धुरंधर'मध्ये रणवीर सिंगने प्रेक्षकांची मनं जिंकली असली, तरी अक्षय खन्नाने साकारलेला 'रहमान डकैत' हा या चित्रपटाचा खरा आत्मा ठरला आहे. त्याची संवादफेक आणि डोळ्यांतील ती हिंस्र छटा पाहून अनेकांना तो खरा गुन्हेगार वाटू लागला आहे.
advertisement
8/9
दुसरीकडे, संजय दत्तने एसपी असलमची भूमिका साकारली आहे, जी खऱ्या आयुष्यातील लियारी टास्क फोर्सच्या प्रमुखावर आधारित आहे. आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांच्या दमदार कामामुळे या चित्रपटाने जगभरात १००० कोटी रुपयांहून अधिक कमाईचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे.
advertisement
9/9
आदित्य धरने लियारीमधील गँगवॉर आणि स्पाई थ्रिलरची जी गुंफण घातली आहे, ती प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे. जरी हा चित्रपट काल्पनिक असल्याचं म्हटलं जात असलं, तरी त्याला वास्तवाचा जो पदर जोडला आहे, त्यामुळेच सीमेपलीकडूनही अशा प्रतिक्रिया येत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'जे पाकिस्तानला जमलं नाही, ते भारताने करून दाखवलं!', 'रहमान डकैत'च्या मित्राने केलं बॉलीवूडचं कौतुक, म्हणाला...