'या' अभिनेत्रीनं मैत्रिणीच्या नवऱ्याशीचं केलं धुमधडाक्यात लग्न; MMS लीकमुळे उडाली खळबळ
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
दक्षिणेतील लोकप्रिय आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे हंसिका मोटवानी. आपल्या निरागस हास्यानं सगळ्यांना घायाळ करणारी हंसिका आज 33 वर्षांची झाली आहे. छोट्या पडद्यापासून, बॉलीवूड आणि टॉलिवूडपर्यंत तिने आपला ठसा उमटवला आहे. हंसिकाच्या वैयक्तिक आयुष्याचीही चांगलीच चर्चा होते. कधी हार्मोनल इंजेक्शन्समुळे, तर कधी एमएमएस लीकमुळे हंसिका कायम चर्चेत राहिली.
advertisement
1/8

हंसिकाने बाल कलाकार म्हणून टीव्ही इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. ती 2000 मध्ये 'शाका लाका बूम बूम' मध्ये दिसली होती आणि त्यानंतर ती एकता कपूरची लोकप्रिय मालिका 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' मध्ये देखील दिसली होती.
advertisement
2/8
2003 मध्ये हंसिता मोटवानी हृतिक रोशन आणि प्रीती झिंटाच्या 'कोई मिल गया' मध्येही दिसली होती. यानंतर हंसिका आपल्या कुटुंबासह परदेशात गेली. त्यानंतर ती 2007 मध्ये ती 'देशमुदुरु' तेलगू चित्रपटाद्वारे 4 वर्षांनी पडद्यावर परतली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यावेळी हंसिकाच्या आईनं तिला हार्मोनल इंजेक्शन दिल्याचा आरोप तिच्यावर झाला होता.
advertisement
3/8
हंसिका मोटवानी पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटलं होतं. कारण कमी वयाची हंसिका आपल्या वयापेक्षा मोठी दिसत होती. तेव्हा अभिनेत्रीनं मोठं दिसण्यासाठी तिच्या आईकडून हार्मोनल इंजेक्शन घेतल्याचा आरोप होता. मात्र, अभिनेत्रीनं हे आरोपही फेटाळून लावले.
advertisement
4/8
तिच्यापेक्षा 18 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यावर रोमान्स करताना दिसल्याने तिने हेडलाइन्सही बनवली होती. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी ती आपल्यापेक्षा 18 वर्षांनी मोठ्या हिमेश रेशमियासोबत 'आपका सुरुर' चित्रपटात रोमान्स केला होता.
advertisement
5/8
हंसिका मोटवानीने 4 डिसेंबर 2022 रोजी तिचा बॉयफ्रेंड सोहेल कथुरिया याच्याशी जयपूरच्या मुंडोटा फोर्टमध्ये धुमधडाक्यात लग्न केलं.
advertisement
6/8
सोहेल कथुरियाने 2006 मध्ये हंसिका मोटवानीची मैत्रिण रिंकी बजाजसोबत गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केलं होते. हंसिकाही त्यांच्या लग्नात सहभागी झाली होती. पण त्यांचा घटस्फोट होताच हंसिकाने सोहेलसोबत लग्नगाठ बांधली.
advertisement
7/8
याशिवाय ती एमएमएस लीकच्या वादातही अडकली होती. 2015 मध्ये एका मुलीचा अंघोळ करतानाचा MMS व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये ती हंसिका असल्याचा दावा करण्यात आला होता. पण नंतर हंसिकाने स्वतः व्हिडिओमध्ये ती तिची नसून तिच्यासारखी दिसणारी दुसरी मुलगी असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.
advertisement
8/8
हंसिकाची सुरुवात जरी साहित्य पडद्यापासून झाली असली तरी ती आज साऊथ चित्रपटसृष्टीतील मोठं नाव आहे. तिने तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये चित्रपट केलं आहेत. तिनं 60 हून अधिक चित्रपट केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'या' अभिनेत्रीनं मैत्रिणीच्या नवऱ्याशीचं केलं धुमधडाक्यात लग्न; MMS लीकमुळे उडाली खळबळ