TRENDING:

Benefits of Avocado: रोज ॲवाकॅडो खाल्ल्याने होतील अनेक फायदे, दूर पळतील गंभीर आजार

Last Updated:
Health Benefits of Avocado in Marathi: फळांमध्ये पोषक तत्त्वं भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे आजच्या धकाधकीच्या जीवनात जर फीट राहायचं असेल तर फळं खाणं सर्वोत्तम. अनेक जण दैनंदिन आहारामध्ये सफरचंद, सीताफळ, पेरू, केळी अशा फळांचा समावेश करतात. मात्र ॲवाकॅडोचा समावेश केल्याने शरीराला तर फायदे होतीलच मात्र अनेक गंभीर आजांराना दूर ठेवता येईल. जाणून घेऊयात ॲवाकॅडो खाण्याचे फायदे.
advertisement
1/7
Benefits of Avocado: ॲवाकॅडो खाल्ल्याने होतील अनेक फायदे, दूर पळतील गंभीर आजार
आजच्या धकाधकीच्या जीवनात बदलेल्या खाद्यपद्धतीमुळे आणि ताणतणावामुळे शरीराला अत्यावश्यक पोषक तत्वं मिळत नाहीत. अशावेळी फळांचा वापर केल्याने पोषक तत्वांची कमतरता पूर्ण होते आणि शरीर स्वस्थ राहायला मदत होते.
advertisement
2/7
ॲवाकॅडोत पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मँगनीज, फॉस्फरस, तांबे आणि झिंक या सारखे विविध घटक असतात जे शरीराला एकाच वेळी अनेक फायदे देऊ शकतात.
advertisement
3/7
ॲवाकॅडोमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात.त्यामुळे पोट भरलेले राहून भूक नियंत्रणात राहते. त्यामुळे अतिरिक्त कॅलरीज शरीरात जाण्याचा धोका टळतो आणि वजन नियंत्रणात ठेवता येतं.
advertisement
4/7
डायबिटीस असलेल्या रुग्णांनी ॲवाकॅडो खाणं फायद्याचं ठरतं. ॲवाकॅडो खाल्ल्याने शरीरात इन्सुलिन तयार व्हायला मदत होते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवली जाऊ शकते. टाईप 2 डायबिटीस असलेल्या रूग्णांसाठी ॲवाकॅडो फायदेशीर फळ आहे.
advertisement
5/7
ॲवाकॅडोमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते, त्यामुळे ॲवाकॅडोच्या नियमित सेवनाने हाडांचा ठिसूळपणा दूर होऊन हाडं मजबूत होतात. ॲवाकॅडोच्या दाहक विरोधी गुणधर्मांमुळे सांधेदुखीवरही ते परिणामकारक ठरतं.
advertisement
6/7
ॲवाकॅडो हे दृष्टीदोषावर फायदेशीर फळ आहे. लहान मुलांना कमी दिसत असेल किंवा त्यांना अंधत्वाची सुरूवात झाली असेल किंवा बराच वेळ लॅपटॉपसमोर बसून काम केल्याने तुमच्या डोळ्यांना थकवा येत असेल तर ॲवाकॅडो खाल्ल्याने दृष्टीदोष कमी व्हायला मदत होईल
advertisement
7/7
ॲवाकॅडो हे शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करते आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवते. त्यामुळे ॲवाकॅडो खाल्ल्याने हृदयविकार किंवा हार्ट ॲटॅकचा धोका टाळता येतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Benefits of Avocado: रोज ॲवाकॅडो खाल्ल्याने होतील अनेक फायदे, दूर पळतील गंभीर आजार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल