IND vs PAK : 'भारताविरुद्ध खेळायला तयार, पण...', पाकिस्तानची नवी नौटंकी, ठेवल्या 3 अटी!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्यावरून नवा ड्रामा सुरू झाला आहे. भारताविरुद्धचा सामना खेळण्यासाठी पाकिस्तानने 3 अटी ठेवल्याचं वृत्त समोर आलं आहे.
advertisement
1/8

15 फेब्रुवारीला टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकत असल्याची घोषणा पाकिस्तान सरकारने केली, पण आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून नवीन नौटंकी सुरू झाली आहे.
advertisement
2/8
लाहोरच्या गडाफी स्टेडियममध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्ड, आयसीसी आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात बैठक होत आहे. या बैठकीमध्ये भारताविरुद्धचा सामना खेळण्यासाठी पाकिस्तान 3 मागण्या करू शकते, अशी वृत्त समोर येत आहेत.
advertisement
3/8
गडाफी स्टेडियमच्या या बैठकीत पाकिस्तानकडून मोहसिन नक्वी, आयसीसीकडून इम्रान ख्वाजा आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून अमिनुल इस्लाम बुलबुल सहभागी झाले आहेत.
advertisement
4/8
आयसीसीकडून प्रत्येक देशाच्या बोर्डाला महसूल दिला जातो, या महसुलामध्ये वाढ करावी, अशी पहिली मागणी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बैठकीत करण्याची शक्यता आहे.
advertisement
5/8
मागच्या काही वर्षांपासून भारत-पाकिस्तान यांच्यात आयसीसी स्पर्धा वगळता सीरिज होत नाहीयेत, त्यामुळे या दोन्ही सीरिज सुरू व्हाव्यात, अशी दुसरी मागणी पाकिस्तानकडून केली जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने ही मागणी केली, तरीही ही मागणी आयसीसीच्या अखत्यारीत येत नाही.
advertisement
6/8
आशिया कपमध्ये भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं नाही, त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. टी-20 वर्ल्ड कपचा सामना खेळायचा असेल, तर दोन्ही देशाच्या खेळाडूंनी हस्तांदोलन करावं, अशी अटही पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ठेवण्याची शक्यता आहे.
advertisement
7/8
टॉस वेळी दोन्ही कॅप्टननी आणि मॅच संपल्यानंतर खेळाडूंनी हस्तांदोलन करायचं का नाही? हा प्रत्येक टीमचा वैयक्तिक निर्णय असतो. आयसीसीच्या नियमांमध्ये हस्तांदोलन करणं अनिवार्य नाही, त्यामुळे पाकिस्तानची ही मागणीही पूर्ण व्हायची शक्यता कमी आहे.
advertisement
8/8
दुसरीकडे सुरक्षेच्या कारणामुळे बांगलादेशने भारतात टी-20 वर्ल्ड कप खेळायला नकार दिला. वर्ल्ड कप बहिष्कार टाकल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी बांगलादेश क्रिकेट बोर्डकडून होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK : 'भारताविरुद्ध खेळायला तयार, पण...', पाकिस्तानची नवी नौटंकी, ठेवल्या 3 अटी!