Benefits of Garlic: लसणाचे ‘इतके’ फायदे माहिती आहेत का ? रोज खा लसूण दूर पळतील कॅन्सर, हार्ट ॲटॅक
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Benefits of Garlic: स्वयंपाकाची चव वाढावी, यासाठी फोडणीमध्ये लसणाचाही वापर केला जातो. आयुर्वेदात तर लसणाला औषध मानलं गेलंय. लसणातल्या पोषक घटकांमुळे अनेक लहानमोठ्या आजारांपासून आपलं संरक्षण होतं. नियमितपणे लसणाचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. याशिवाय कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्स लिपिड कमी करून हृदयाचं आरोग्य देखील सुधारतं
advertisement
1/7

लसणात अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात, त्यामुळे सकाळी उपाशीपोटी लसूण खाल्यास कॅन्सरचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो.
advertisement
2/7

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी रोज लसणाच्या पाकळ्या खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. लसणात काही असे घटक असतात जे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करते. त्यामुळे दररोज लसूणच्या पाकळ्या खाव्यात.
advertisement
3/7
मानसिक आरोग्यासाठी लसूण वरदान आहे. लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने नैराश्यावर मात करता येते. त्यामुळे डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी अनेकदा लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement
4/7
लसणात ॲलिसिन नावाचा घटक असतो जो रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढवतो. त्यामुळे साखर नियंत्रणात राहते. मधुमेहींनीही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दररोज भाजीतून किंवा थेट लसण्याच्या पाकळ्या खाव्यात.
advertisement
5/7
अंकूर आलेल्या लसणामुळे आपल्या शरिरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते. लसणाच्या सेवनामुळे आपलं शरीर अनेक रोगांशी लढण्यासाठी सज्ज होतं.
advertisement
6/7
लसणामध्ये एँटी-ऑक्सिंडट प्रॉपर्टी मोठ्या प्रमाणावर आढळते. यामुळे आपल्या शरिरातील तणाव कमी होतो तसेच आपली त्वचा नेहमी तजेलदार राहते. आपला उत्साह तसेच आपला मूड फ्रेश राहण्यास मदत होते.
advertisement
7/7
उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी भाजलेले लसूण खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. लसूण कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्स कमी करून रक्तदाब नियंत्रणात ठेवतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Benefits of Garlic: लसणाचे ‘इतके’ फायदे माहिती आहेत का ? रोज खा लसूण दूर पळतील कॅन्सर, हार्ट ॲटॅक