घराची खिडकी सजवा स्वस्तात, या ठिकाणी मिळतात 100 रुपयांत पडदे PHOTOS
- Published by:News18 Lokmat
- local18
Last Updated:
घराच्या पडद्यांमुळे घराला एक वेगळीच शोभा येते. तुम्हालाही घर सजवण्यासाठी स्वस्तात पडदे हवे असतील तर ठाण्यातील एका ठिकाणाबद्दल माहिती देणार आहोत.
advertisement
1/6

अनेकांना घर सजवण्याची आवड असते. घराला असलेल्या रंगाप्रमाणे साजेसे पडदे खरेदी करण्यास गृहिणी प्राधान्य देतात. अशा वेळी जर तेच पडदे स्वस्त दरात कुठे मिळत असतील तर महिला अगदी आवडीने जास्तीत जास्त पडदे खरेदी करतात.
advertisement
2/6
घराच्या पडद्यांमुळे घराला एक वेगळीच शोभा येते. तुम्हालाही घर सजवण्यासाठी स्वस्तात पडदे हवे असतील तर ठाण्यातील एका ठिकाणाबद्दल माहिती देणार आहोत. जिथे तुम्ही युनिक डिझाईनचे पडदे अगदी स्वस्त दरात खरेदी करू शकतात.
advertisement
3/6
ठाण्याच्या स्टेशन रोड शिवाजीपत परिसरात असलेल्या हरियाणा हॅण्डलूम कॅम्प या दुकानात 100 रुपयांत पडदे मिळत आहेत. हरियाणा हॅण्डलूमचे संस्थापक मोहनलाल सलुजा यांनी 1972 साली हे दुकान सुरू केले होते. सध्या त्यांचा मुलगा सनी सलुजा हा व्यापार सांभाळत आहेत. मोहनलाल सलुजा यांचा स्वतःचा कारखाना असून ते पडद्यात चांगल्या क्वालिटीचा फॅब्रिक वापरतात.
advertisement
4/6
हरियाणा हॅण्डलूम कॅम्प हे दुकान होलसेल आणि रिटेल असून या ठिकाणी अगदी स्वस्त दरात पडदे, उशी, सोफ्याचे कव्हर आणि बेडशीट पाहायला मिळतात. इथे मिळणारे 100 रुपयांचे पडदे हे पॉलिस्टर आणि निटिंग या कपड्यांचे बनलेले असतात.
advertisement
5/6
या ठिकाणी 100 रुपयांच्या किमतीत वेगवेगळ्या रंगासोबतच वेगवेगळे नक्षीदार पडदे मिळतील. या दुकानात ग्राहक आपल्या आवडीनुसार कोणतेही आकाराचा पडदा बनवून घेऊ शकतात. त्याचबरोबर येथे बेडशीट देखील उपलब्ध आहेत.
advertisement
6/6
आमचे दुकान पडदे आणि सोफा कव्हरचे आहे. आम्ही पडदे, बेडशीट, सोफा कव्हर, उशी, उषांचे कव्हर त्याचबरोबर साफसफाईचा कपडा टॉवेल असे अनेक प्रकार कमी दरात विक्री करतो. इथे मागवण्यात येणारे पडदे, बेडशीट हे हरियाणाच्या पानिपत ठिकाणाहून आणले जातात,अशी माहिती हरियाणा हॅण्डलूमचे मालक सनी सलुजा यांनी दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
घराची खिडकी सजवा स्वस्तात, या ठिकाणी मिळतात 100 रुपयांत पडदे PHOTOS