TRENDING:

T20 World Cup : एक दिवस आधी होता घरी, अचानक टीम इंडियात एन्ट्री, बुमराहच्या जागी खेळणार पहिली मॅच!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप 2026 ला सुरूवात झाली आहे. टीम इंडियाचा पहिला सामना शनिवारी संध्याकाळी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
advertisement
1/6
एक दिवस आधी होता घरी, अचानक टीममध्ये एन्ट्री, बुमराहच्या जागी खेळणार पहिली मॅच!
टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्याआधी फास्ट बॉलर मोहम्मद सिराजची टीम इंडियामध्ये एन्ट्री झाली आहे. हर्षित राणाला दुखापत झाल्यामुळे मोहम्मद सिराज शुक्रवारी टीम इंडियामध्ये आला. कालपर्यंत मोहम्मद सिराज हैदराबादमध्ये त्याच्या घरी होता.
advertisement
2/6
युएसएविरुद्धचा पहिल्या सामन्यात टीम इंडियाला जसप्रीत बुमराहशिवाय मैदानात उतरावं लागू शकतं. समोर आलेल्या माहितीनुसार बुमराह मॅचच्या दिवशी सकाळी आजारी पडला आहे, त्यामुळे त्याच्याऐवजी मोहम्मद सिराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. बुमराहला शनिवारी सकाळी ताप आल्याचं सांगण्यात येत आहे.
advertisement
3/6
मोहम्मद सिराजने 2024 साली श्रीलंकेविरुद्ध शेवटची टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळली होती. सिराजने 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 14 विकेट घेतल्या आहेत. सिराजशिवाय टीम इंडियामध्ये फार बदल केले जाणार नाहीत.
advertisement
4/6
पहिल्या टी-20 सामन्यात ओपनिंगला कोण खेळणार? याबाबतची साशंकता कायम आहे. संजूचा खराब फॉर्म बघता अभिषेक शर्मा आणि इशान किशन ओपनिंगला खेळण्याची शक्यता आहे. तर पूर्णपणे फिट झालेला तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला येईल.
advertisement
5/6
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया ग्रुप ए मध्ये आहे. भारतासोबत या ग्रुपमध्ये पाकिस्तान, नामिबिया, नेदरलँड्स आणि युएसए यांचा समावेश आहे.
advertisement
6/6
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : एक दिवस आधी होता घरी, अचानक टीम इंडियात एन्ट्री, बुमराहच्या जागी खेळणार पहिली मॅच!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल