TRENDING:

Health Tips : शरीरातील कोलेस्ट्रॉल राहील नियंत्रित! तुळस आणि हळदीचे या उपायांनी होईल फायदा

Last Updated:
बदलत्या जीवनशैलीमुळे हल्ली आपल्या आरोग्यावर खूप लवकर कोणत्याही गोष्टीचा परिणाम होतो. हल्ली लोकांना कोलेस्ट्रॉलची समस्याही मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे कोलेस्ट्रॉल खूप जास्त प्रमाणात वाढल्यास आपल्या जीवाला धोका असतो. म्हणूनच वेळीच यावर उपाय करणं आवश्यक असतं. आज आम्ही तुम्हाला हळद आणि तुळशीचे काहीं सोपे उपाय सांगत आहोत.
advertisement
1/6
शरीरातील कोलेस्ट्रॉल राहील नियंत्रित! तुळस आणि हळदीचे या उपायांनी होईल फायदा
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि आहारात अतिरिक्त चरबीचे सेवन केल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. चुकीच्या आहारासोबत बैठी जीवनशाली म्हणजेच शारीरिक हालचालींच्या अभावामुळेही हि समस्या वाढते.
advertisement
2/6
तुळस आणि हळद दोन्ही ही नैसर्गिक औषधे आहेत, ज्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. म्हणूनच हळद आणि तुळस दोन्हीही कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.
advertisement
3/6
तुळशीच्या पानांचा काढा यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. एका ग्लास पाण्यात 5-6 तुळशीची पाने टाकून उकळा. पाणी निम्मे झाल्यावर गाळून त्यात मध किंवा लिंबाचा रस घाला आणि ते प्या. तुम्ही ते दिवसातून दोनदा हा काढा पिऊ शकता.
advertisement
4/6
हळदीमध्ये कर्फ्यूमिन नावाचे संयुग असते, जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. हळदीचे फायदे मिळवण्यासाठी एक ग्लास दुधात चिमूटभर हळद घालून उकळा आणि दूध उकळल्यानंतर ते गाळून प्या. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हे दूध पिऊ शकता.
advertisement
5/6
तुम्ही हळद आणि तुळशीची पानं सोबतही घेऊ शकता. यासाठी एक कप पाण्यात 5-6 तुळशीची पाने आणि चिमूटभर हळद घालून उकळा. हे पाणी अर्धे झाल्यावर ते गाळून घ्या आणि त्यात मध किंवा लिंबाचा रस टाकून प्या.
advertisement
6/6
तुम्ही तुळशीची पानं चावून देखील खाऊ शकता. सकाळी रिकाम्या पोटी दोन चार तुळशीची पानं चावून खावीत. यामुळे वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यात खूप मदत होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Health Tips : शरीरातील कोलेस्ट्रॉल राहील नियंत्रित! तुळस आणि हळदीचे या उपायांनी होईल फायदा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल