TRENDING:

आधी Dhurandhar 2 बद्दल नको ते बोलली, ट्रोल होतात डिलीट केलं अकाऊंट, 'सैयारा' फेम हिरोईनच्या बहिणीचं पाकिस्तानी कनेक्शन?

Last Updated:
Dhurandhar Box Office Collection: नुकतंच बॉलिवूडच्या स्टार अभिनेत्रीच्या बहिणीने 'धुरंधर' या फिल्मबद्दल सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, मात्र प्रकरण अंगाशी येताच तिने थेट इन्स्टाग्राम अकाउंट डिलिट करत पळ काढला आहे.
advertisement
1/8
आधी Dhurandhar 2 बद्दल नको ते बोलली, ट्रोल होतात डिलीट केलं अकाऊंट
कोणत्याही बॉलिवूड फिल्मला जमलं नाही, ते धुरंधरने करून दाखवलं आहे. अवघ्या १० दिवसांत ११०० कोटींची कमाई करत या सिनेमाने इतिहास रचला आहे. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असलेल्या या फिल्मचं यश काहींना बघवत नसल्याचं दिसतंय.
advertisement
2/8
रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई करणाऱ्या या फिल्मला काहीजण प्रोपेगंडा म्हणत आहेत. नुकतंच बॉलिवूडच्या स्टार अभिनेत्रीच्या बहिणीने या फिल्मबद्दल सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, मात्र प्रकरण अंगाशी येताच तिने थेट इन्स्टाग्राम अकाउंट डिलिट करत पळ काढला आहे.
advertisement
3/8
'सैयारा' फेम अभिनेत्री अनीत पड्डा हिची बहीण रीत पड्डा सध्या सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होत आहे. रीतने एका सोशल मीडिया यूजरला उत्तर देताना 'धुरंधर २' ला एक प्रोपेगंडा फिल्म म्हटलं आहे.
advertisement
4/8
रीतच्या मते, हा चित्रपट केवळ एका विशिष्ट विचारधारेचं समर्थन करण्यासाठी बनवला गेला आहे. तिने आपल्या कमेंटमध्ये लिहिलं, "धुरंधरमध्ये सरकारने घेतलेल्या निर्णयांचं समर्थन करण्यासाठी राजकीय भाषणांचा वापर केलाय. अगदी नोटबंदीसारख्या निर्णयातील त्रुटींनाही त्यांनी योग्य ठरवलं आहे. याला तुम्ही प्रोपेगंडा म्हणाल का? तर हो, नक्कीच! कोणी हे नाकारेल का? चान्सच नाही."
advertisement
5/8
रीत एवढ्यावरच थांबली नाही. तिने 'द काश्मीर फाईल्स' आणि 'द केरळ स्टोरी' या चित्रपटांचं नाव घेत त्यांनाही प्रोपेगंडा म्हटलं आहे. या वादात तिने प्रियांका चोप्राचं नाव घेत, तिच्या पॅलेस्टाईन मुद्द्यावरील मौनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.
advertisement
6/8
रीतच्या विधानानंतर नेटकऱ्यांनी तिला देशद्रोही ठरवत ट्रोल करायला सुरुवात केली. ट्रोलिंग सहन न झाल्याने आधी आपलं इन्स्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट केलं, पण तरीही कमेंट्स थांबल्या नाहीत. शेवटी वैतागून तिने आपलं इन्स्टाग्राम अकाउंटच डिलीट करून टाकलं आहे.
advertisement
7/8
याच वादात रीतची पर्सनल लाइफही चव्हाट्यावर आली आहे. सध्या अशी चर्चा आहे की, रीत एका पाकिस्तानी तरुणाला डेट करत आहे, ज्याचं नाव फाजिल अहमद असून काही दिवसांपूर्वी अनीत पड्डा पॅरिसला गेली असताना तिने रीत आणि फाजिलसोबतचे काही फोटो शेअर केले होते. तेव्हापासूनच या दोघांच्या नात्याची चर्चा सुरू झाली.
advertisement
8/8
अनीत पड्डा बॉलिवूडमध्ये सक्रिय असून याउलट तिची बहीण रीत पॅरिसमध्ये 'कॉस्च्युम सक्सेस मॅनेजर' म्हणून काम करते. तिच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार ती एक मार्केटिंग स्पेशलिस्ट असून मार्केट रिसर्च आणि कॅम्पेन स्ट्रॅटेजीमध्ये तिला मोठा अनुभव आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आधी Dhurandhar 2 बद्दल नको ते बोलली, ट्रोल होतात डिलीट केलं अकाऊंट, 'सैयारा' फेम हिरोईनच्या बहिणीचं पाकिस्तानी कनेक्शन?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल