TRENDING:

म्हणूनच तुला हाकललं! Bigg Boss Marathi 6 च्या घरातून बाहेर आलेल्या स्पर्धकाचा प्रताप, एकदा Video पाहाच

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 मधून बाहेर पडलेला हा स्पर्धक, ज्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो चांगलाच व्हायरल होतो आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुरुवातीला 17 स्पर्धक आणि नंतर 4 वाइल्ड कार्ड एंट्री, असा सुरू झालेला बिग बॉस मराठीचा सहावा सीझन आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. या आठवड्यात प्रभू शेळके घराबाहेर पडला आहे. अशात आता घराबाहेर पडलेल्या एका स्पर्धकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
News18
News18
advertisement

बिग बॉस मराठी 6 च्या घरातून बाहेर पडलेला एक स्पर्धक जो गाडी खरेदी करायला गेला. साधीसुधी गाडी नाही तर मर्सिडीज बेन्ज. आता बिग बॉस मराठीचा स्पर्धक म्हणजे आता तो त्याचं स्वप्न पूर्ण करत असेल, असंच सगळ्यांना वाटेल. हा स्पर्धक ऑटोरिक्षामधून गाडीच्या शोरूममध्ये आला आणि शोरूममध्ये गेला. तेव्हा अनेकांना त्याचं कौतुक वाटलं. सगळ्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षावर सुरू केला. पण या व्हिडीओचा शेवट मात्र काही भलताच आहे.

advertisement

फायनली मर्सिडीज बेन्ज असं म्हणत बिग बॉस मराठी 6 मधून बाहेर पडलेल्या या स्पर्धकाने आपल्या सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओच्या खाली त्याने "स्वप्न सत्यात उतरलं. तुमच्या बेस्ट विशेस आणि अभिनंद माझ्या रिलवर पाठवा. फायनली", असं लिहिलं आहे.

Bigg Boss Marathi 6 : विशालसोबत तन्वी, दिपालीने हे काय केलं; प्रेक्षकांनी केली थेट घराबाहेर काढण्याची मागणी

advertisement

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता आपल्या आईबाबांसोबत तो एका कारच्या शोरूममध्ये येतो. तिथं मर्सिडीज बेन्ज गाडीही दाखवण्यात आली आहे, त्याकडे तो पाहतो. त्यानंतर शोरूममध्ये त्यांचं कॉफी वगैरे देऊन स्वागत केलं जातं. अगदी स्टाईलमध्ये एंट्री आणि कॉफी प्यायल्यानंतर हा स्पर्धक पेपर साइन करतानाही दिसतो.

पण शेवटी मात्र एक वेगळा ट्विस्ट आहे. हा स्पर्धक शोरूममधून बाहेर पडतो. पण गाडीसोबत नाही तर जसा चालत आला तसाच चालत तो बाहेर पडतो आणि मागून शोरूममध्ये त्यांना गाडी दाखवणारा तो कर्मचारीही वैतागून डोक्याला हात लावताना दिसतो. आता कॅप्शनही थोडं बदलेलं दिसेल. फायनली मर्सिडीज बेन्ज शोरूममध्ये जाऊन आलो, असं कॅप्शन या व्हिडीओच्या शेवटी दिसतं.

advertisement

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा अपघात; गंभीर दुखापत, तातडीने शस्त्रक्रिया

एकंदर काय तर व्हिडीओच्या सुरुवातीला या बिग बॉस मराठी फेम स्टारने मर्सिडीज बेन्ज घेण्याचं स्वप्न साकार करत असल्याची हवा तयार केली आणि व्हिडीओ शेवटी ही हवाच काढून टाकली. हा स्पर्धक दुसरा तिसरा कुणी नाही तर तो आहे करण सोनावणे. ज्याने त्याच्या फोकस इंडिया या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात लिंबूचे दर तापले, कांद्याला सरासरी दर, APMC मार्केटमधून नवी अपडेट
सर्व पहा

त्याच्या या पोस्टवर फक्त सुरुवात आणि कॅप्शन पाहून अनेकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला पण शेवट पाहून सगळ्यांना हसू आलं आहे. एका युझरने तर म्हणूनच तुला बिग बॉसमधून हाकललं अशी कमेंटही केली आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
म्हणूनच तुला हाकललं! Bigg Boss Marathi 6 च्या घरातून बाहेर आलेल्या स्पर्धकाचा प्रताप, एकदा Video पाहाच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल