TRENDING:

घरात किती पेट्रोल स्टोअर करू शकता? जास्त ठेवल्यास काय? अवश्य जाणून घ्या नियम

Last Updated:
सध्या देशभरात पेट्रोल-डिझेलच्या उपलब्धतेविषची चिंतेचं वातावरण आहे. काही लोकं हे घरातही पेट्रोल स्टोअर करत आहेत. मात्र सरकारने स्पष्ट सांगितलंय की, देशात इंधनाची कमतरता नाही.
advertisement
1/7
घरात किती पेट्रोल स्टोअर करू शकता? जास्त ठेवल्यास काय? अवश्य जाणून घ्या नियम
नवी दिल्ली : जगभरात सध्या युद्धाचं वातावरण आहे. ज्यामुळे आपल्या भारतातील लोकंही घाबरलेले आहेत. काही दिवसांपासून एलपीजीचा तुटवडा असल्याच्या चर्चा होत्या. ज्यामुळे लोकं एलपीजी सिलेंडर खरेदी करण्यासाठी रांगा लावत होते. आता पेट्रोल-डिझेलहीची तिच स्थिती आहे. लोकं पेट्रोल-डिझेलची साठेबाजी करण्यासाठी पेट्रोलपंपावर रांगा लावताना दिसताय. दरम्यान सरकारने स्पष्ट केलंय की, देशात पेट्रोल किंवा गॅसची कोणतीही कमतरता नाही. यासोबतच पुरवठाही सामान्य आहे. तरीही पेट्रोल घरात स्टोअर करण्याचा काय कायदा आहे. चला जाणून घेऊया.
advertisement
2/7
घरात आपण किती पेट्रोल ठेवू शकतो? : भारतात पेट्रोल आणि डिझेलसारखे ज्वलनशील पदार्थ स्टोअर करण्याविषयी कठोर नियमावली आहे. पेट्रोलियम अॅक्ट 1934 आणि पेट्रोलियम रुल्स 2002 नुसार, कोणत्याही विशेष लायसेन्सशिवाय तुम्ही तुमच्या घरात जास्तीत जास्त 30 लिटर पेट्रोल किंवा डिझेल ठेवू शकता.
advertisement
3/7
हे पेट्रोल सुरक्षित कंटेनर, म्हणजेच मेटल कॅन किंवा मान्य प्लास्टिक कंटेनसरमध्येच ठेवायला हवं. या मर्यादेचे पालन करणे हे सुरक्षा आणि कायदा दोन्हीच्या हिशोबाने अत्यंत गरजेचं आहे.
advertisement
4/7
लिमिटपेक्षा जास्त पेट्रोल स्टोअर केल्यास काय? : एखाद्या व्यक्तीने कोणतंही लायसेन्स नसताना 30 लिटरपेक्षा जास्त पेट्रो घरात ठेवलं तर त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई होऊ शकते. यात भारी दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
advertisement
5/7
पेट्रोल अत्यंत ज्वलनशील पदार्थ आहे. यामुळे तो घरात ठेवल्याने आग आणि स्फोटाचा मोठा धोका असतो. याच कारणामुळे कायदा यावर कठोर निर्बंध घालतो.
advertisement
6/7
पेट्रोल साधवून ठेवताना अशी घ्या काळजी : पेट्रोल नेहमी व्हेंटिलेशन असणाऱ्या जागांवरच ठेवा. ते घरात ठेवताना किचनमध्ये अजिबात ठेवू नका. तुम्ही हे पेट्रोल गॅरेट किंवा शेडमध्ये ठेवू शकता. यासोबतच पेट्रोलच्या आजुबाजूला आग किंवा ठिणगी उडेल असं काहीच असू नये. हीटर किंवा सिगारेटचा वापर अजिबात करू नका. साध्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पेट्रोल ठेवणं हानिकारक असतं. कारण ती पघळू शकते किंवा लीक होऊ शकते.
advertisement
7/7
पेट्रोलच्या तुटवड्याविषयी घाबरण्याची अजिबात गरज नाही. कारण सरकारने पुरवठा सामान्य असल्याचं म्हटलंय. अशावेळी गरजेपेक्षा जास्त पेट्रोल जमा करणे कायद्याच्या विरोदात आहे. एवढंच नाही तर हे तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठीही हानिकारक ठरतं. योग्य माहिती आणि नियमांचे पालन करुन तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकता. यासोबतच मोठ्या दुर्घटनेपासूनही बचाव करू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
घरात किती पेट्रोल स्टोअर करू शकता? जास्त ठेवल्यास काय? अवश्य जाणून घ्या नियम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल