benefits of cinnamon प्रत्येक स्वयंपाक घरात असतो ‘हा’ गरम मसाला; मात्र फायदे किती जणांना माहिती आहेत ?
- Published by:Tushar Shete
Last Updated:
benefits of cinnamon दालचिनी हा गरम मसाल्यांचा एक प्रकार आहे. नावाप्रमाणे दालचिनी चवीला तिखट नसून गोड आहे. लाकडासारखी दिसत असल्यामुळे दालचिनीच भेसळ होण्याच प्रमाण वाढलंय. दालचिनी ही फक्त जेवणापुरता मर्यादित राहिली नसून औषधी गुणधर्मांमुळे अनेक आजारांवर दालचिनी गुणकारी ठरते आहे.
advertisement
1/7

वजन कमी करण्यासाठी आणि पोटाच्या आरोग्यासाठी दालचिनीचं पाणी खूप फायदेशीर आहे. बद्धकोष्ठता आणि गॅसेसच्या समस्यांपासून दालचिनीच्या पाण्यामुळे आराम मिळू शकतो.
advertisement
2/7
दालचिनीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे डोकेदुखी, सांधेदुखी बरी करायला मदत करतात. दालचिनी मायग्रेनसारख्या गंभीर आजारानर घरगुती उपचारांमध्ये फायद्याची ठरते.
advertisement
3/7
दालचिनीमध्ये पॉलीफेनॉल नावाचं अँटीऑक्सिडंट असतं. ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. दालचिनीचे अँटीव्हायरल गुणधर्म सर्दी आणि फ्लूच्या विषाणूंविरूद्ध लढण्यास मदत करतात.
advertisement
4/7
दालचिनी अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असल्याने, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दालचिनीमुळे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी होतो. ज्यामुळे हृदयविकार आणि मधुमेह यांसारखे गंभीर आजार टाळता येतात.
advertisement
5/7
दालचिनीमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आहेत जे तोंडाच्या रोगांवर आणि दातांच्या आरोग्यासाठी फायद्याचे आहेत. दालचिनीचा अर्क किंवा दालचिनी तेल हे अनेक दंतविकारांना रोखतात.
advertisement
6/7
दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरीअल गुणधर्म असल्याने, त्वचेच्या जखमा आणि विविध त्वचारोगांवर दालचिनी फायद्याची ठरू शकते. याशिवाय जर तुम्हाला फ्रॅक्चर झालं असेल तर दालचिनीच्या पावडरचा लेप दुखण्यापासून आराम देऊ शकतो.
advertisement
7/7
जर तुम्हाला श्वासाच्या दुर्गंधीचा त्रास असेल दालचिनी केवळ दुर्गंधी दूर करत नाही तर श्वासाच्या दुर्गंधीचे मूळ देखील बरे करते. उग्र वासांवर उपचार करण्याव्यतिरिक्त, दालचिनी घरातली दुर्गंधी कमी करण्यातही मदत करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
benefits of cinnamon प्रत्येक स्वयंपाक घरात असतो ‘हा’ गरम मसाला; मात्र फायदे किती जणांना माहिती आहेत ?