चमकदार त्वचा हवीय? तर आवर्जुन वापरा 'हे' पाणी, चेहरा होईल तेजस्वी आणि मुलायम
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
चेहरा उजळ, मऊ आणि निरोगी ठेवण्यासाठी भाताचं पाणी एक नैसर्गिक आणि पारंपरिक उपाय आहे. भात धुतल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या पाण्याचा वापर केला जातो. यामध्ये विटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट्स आणि...
advertisement
1/5

आपल्याला सगळ्यांनाच वाटतं की, आपला चेहरा एकदम तेजस्वी आणि चमकदार दिसावा. त्यासाठी काही लोक कमी दर्जाची औषधं आणि ऑनलाइन जाहिराती पाहून अशा फंद्यात पडतात की आपली चांगली त्वचाही खराब करून घेतात.
advertisement
2/5
बरं.. आता ज्यांना कोणताही साइड इफेक्ट न होता आपला चेहरा तेजस्वी आणि चमकदार बनवायचा आहे, त्यांच्यासाठी तांदळाचं पाणी एक चांगला पर्याय आहे. याशिवाय, तांदळाच्या पाण्यात असलेले काही घटक त्वचेचा रंग सुधारण्यास आणि काळे डाग कमी करण्यास मदत करतात.
advertisement
3/5
तांदळाच्या पाण्यात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात, जे त्वचेतील कोरडेपणा कमी करण्यास मदत करतात, त्यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम होते असं मानलं जातं. चेहरा चमकदार ठेवण्यासाठी तांदळाच्या पाण्याने चेहरा धुण्याची पद्धत अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे.
advertisement
4/5
हे नैसर्गिक मॉइश्चरायझरसारखं काम करतं आणि त्वचेला कोरडं होऊ देत नाही. तांदळाच्या पाण्यातील काही घटक त्वचेवरील जळजळ आणि लालसरपणा कमी करण्यास मदत करतात. त्यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात.
advertisement
5/5
कसं वापरायचं? तांदूळ चांगले धुवा. जास्त पाणी काढून टाका आणि पहिल्या धुण्याचं पाणी बाजूला ठेवा (त्यात जास्त स्टार्च असतो). दुसऱ्या किंवा तिसऱ्या धुण्याचं पाणी एका स्वच्छ भांड्यात जमा करा. हे तांदळाचं पाणी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर वापरणार आहात. एक स्पंज या तांदळाच्या पाण्यात भिजवा आणि हळूवारपणे तुमच्या चेहऱ्यावर लावा. ते नैसर्गिकरित्या सुकू द्या. इच्छित असल्यास, 20-30 मिनिटांनंतर तुम्ही ते कोमट पाण्याने धुवू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
चमकदार त्वचा हवीय? तर आवर्जुन वापरा 'हे' पाणी, चेहरा होईल तेजस्वी आणि मुलायम