मराठवाड्यातल्या 'या' बाजारात 1 लाखांचा टीव्ही मिळतो 12 हजारात!
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका बाजारात मुळ किमतीपेक्षा अर्ध्या किमतीत वस्तू मिळतात. इथं चोरीचा माल नसतो.
advertisement
1/7

छत्रपती संभाजीनगरला पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखले जाते. या शहरात अनेक जागतिक ऐतिहासिक वास्तू आहेत. या वास्तू बघण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. पण या ऐतिहासिक वास्तू सोबतच शहरात असं एक ठिकाण आहे जिथं सर्व प्रकारच्या वस्तू अगदी स्वस्त किमतीत मिळतात.
advertisement
2/7
मुंबईतील चोर बाजाराबाबत आपण ऐकलं असेल. पण छत्रपती संभाजीनगरमध्येही चोर बाजार भरवला जातो. खर तर याचं नाव रविवारचा आठवडी बाजार आहे. पण त्याला चोर बाजार हे नाव कसं पडलं आणि इथं कोणकोणत्या वस्तू मिळतात याबद्दल अनेकांना माहिती नाही.
advertisement
3/7
छत्रपती संभाजीनगर येथे मोंढा परिसरामध्ये दर रविवारी हा आठवडी बाजार भरतो. हा बाजार गेल्या 70 वर्षांपासून भरतो. या बाजारात काही नवीन वस्तू तर काही जुन्या वस्तू अशा दोन्ही प्रकारच्या वस्तू मिळतात. चोर बाजारामध्ये तुम्हाला सुई पासून ते सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू या भेटतात.
advertisement
4/7
विशेष म्हणजे या बाजाराला चोर बाजार म्हटलं जात असलं तरी इथं चोरीच्या वस्तू विकत नाहीत. याचं खरं नाव रविवारचा बाजार असं आहे.
advertisement
5/7
इथं जो माल येतो तो मुंबईच्या चोर बाजार मधून येतो. यामध्ये काही नवीन आणि काही जुना माल असतो. म्हणून याला लोक चोर बाजार असे म्हणतात, असं येथील विक्रेत्यांनी सांगितलं.
advertisement
6/7
कपडे, चप्पल, स्वयंपाकासाठी लागणारी भांडी, सायकल, मोबाईल, टीव्ही, फ्रिज, शेतीसाठी लागणारे सामान, वह्या पुस्तके, पेन, ट्राय पॉड, प्रिंटर, मिक्सर आणि सर्व इलेक्ट्रिक वस्तू भेटतात.
advertisement
7/7
इथं तुम्हाला 1 लाख रुपयांचा टीव्ही फक्त 12 हजार रुपयांत मिळतो. तसेच सर्व वस्तू या त्याच्या मूळ किंमतीच्या अर्ध्या किंमतीत भेटतात, असंही येथील विक्रेत्यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मराठवाड्यातल्या 'या' बाजारात 1 लाखांचा टीव्ही मिळतो 12 हजारात!