TRENDING:

Ajit Pawar: हा घातपातच... मृ्त्यू समोर असतानाही पायलट शब्दही बोलला नाही, शेवटच्या 5 मिनिटांचा रेकॉर्ड रोहित पवारांनी वाचला

Last Updated:
Transcript नुसार 8 .31 .11 sec पायलट ने Visibility विचारली असता ATC कडून 3 Km असल्याचे स्पष्ट सांगितले होते. तरी देखील Landing साठी विमान बारामतीकडे का नेण्यात आले? असा सवाल रोहित पवारांनी केला.
advertisement
1/9
पायलट शब्दही बोलला नाही, शेवटच्या 5 मिनिटांचा रेकॉर्ड रोहित पवारांनी वाचला
अजित दादांचा घातपात असू शकतो ही शंका रोहित पवारांकडून उपस्थित करण्यात आली. त्याचसोबत व्हीएसआर विमान कंपनीचा कारभार आणि पायलटसह अपघातासंदर्भातल्या इतर मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करत संशय व्यक्त केला आहे.
advertisement
2/9
अपघातानंतर विमान मालकाने घाईघाईने विमानाची स्थिती चांगली होती, अशी प्रतिक्रिया दिली याकडे लक्ष वेधून रोहित पवारांनी लक्ष वेधून घेत सडेतोड प्रश्न विचारले. विमानाचा टेकलॉग एअरवर्थी रिपोर्ट कुठे आहे... नियमित मेन्टेनन्स झाला नव्हता का असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
advertisement
3/9
तर १३-१४ दिवसात सरकारने फक्त सीसीटीव्ही गोळा केले आहे. पण बाकी काही केले नाही. चौकशीसुद्धा केली नाही. जर असाच उशीर केला तर सगळे मॅनेज केले जाईल, अशी भीती रोहित पवार यांनी व्यक्त केली.
advertisement
4/9
विमान उतरवण्यासाठी Visibility किमान ५ किमी असणे गरजेचे आहे Transcript नुसार 8 .31 .11 sec पायलट ने Visibility विचारली असता ATC कडून 3 Km असल्याचे स्पष्ट सांगितले होते. तरी देखील Landing साठी विमान बारामतीकडे का नेण्यात आले ?
advertisement
5/9
समोर मृत्यू पाहिल्यामंतर अजित पवारांच्या को पायलटने ओ शिट असे म्हटले पण मुख्य पायलटच्या तोंडातून एकही शब्द निघाला याचा अर्थ काय? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला.
advertisement
6/9
तसेच अपघाताच्या आदल्या दिवशी म्हणजेच 27 जानेवरी रोजीच्या वेळापत्रकानुसार दादा संध्याकाळी मुंबईहून गाडीने पुण्याला येणार होते. त्यावेळी ताफादेखील लागला होता. परंतु दादा गाडीने का निघाले नाहीत. अजितदादा एका मोठ्या नेत्याला भेटणार होते. त्या नेत्याला यायला उशीर झाला का?
advertisement
7/9
नेते उशिरा आल्यामुळे अजितदादांना पुढे निघायला वेळ लागला. साडे पाच वाजता अजितदादा गाडीने जाणार होते. त्यांना पर्याय राहिला नाही आणि त्यांना विमान बुक करावे लागले. म्हणूनच दुसऱ्या दिवशीचे विमान सात वाजून 13 मिनिटांना बुक झाल्याचे पाहायला मिळाले, असा दावा रोहित पवार यांनी केला
advertisement
8/9
तसेच अपघाताच्या आदल्या दिवशी म्हणजेच 27 जानेवरी रोजीच्या वेळापत्रकानुसार दादा संध्याकाळी मुंबईहून गाडीने पुण्याला येणार होते. त्यावेळी ताफादेखील लागला होता. परंतु दादा गाडीने का निघाले नाहीत. अजितदादा एका मोठ्या नेत्याला भेटणार होते. त्या नेत्याला यायला उशीर झाला का?
advertisement
9/9
विशेष म्हणजे अजितदादा यांचा विमान अपघात हा घातपाताचा एक भाग असू शकतो, असा मोठा दावा रोहित पवार यांनी केला आहे. हा दावा करताना रोहित पवार यांनी अनेक मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Ajit Pawar: हा घातपातच... मृ्त्यू समोर असतानाही पायलट शब्दही बोलला नाही, शेवटच्या 5 मिनिटांचा रेकॉर्ड रोहित पवारांनी वाचला
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल