TRENDING:

प्रेमाला हळदीचा रंग लागला! विशाल निकम आणि अक्षया हिंदळकरच्या हळदीचा थाट; 'या' रंगाच्या साडीला नवरीची पसंती

Last Updated:
Vishal Nikam Akshaya Hindalkar Haldi Ceremony: हरिद्वारच्या पावन भूमीवर साखरपुडा उरकल्यानंतर, आता या जोडीच्या हळदीचा शाही सोहळा पार पडला आहे.
advertisement
1/9
प्रेमाला हळदीचा रंग लागला! विशाल निकम आणि अक्षया हिंदळकरच्या हळदीचा थाट
'बिग बॉस मराठी'चे चाहते गेल्या तीन वर्षांपासून ज्या दिवसाची वाट पाहत होते, तो क्षण अखेर जवळ आला आहे. 'बिग बॉस मराठी ३' चा विजेता आणि महाराष्ट्रातील तरुणींचा क्रश विशाल निकम आता अधिकृतपणे आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करतोय.
advertisement
2/9
आपल्या 'सौंदर्या'च्या प्रेमात वेडा झालेल्या विशालने आता तिच्यासोबत संसाराची स्वप्नं विणायला सुरुवात केली आहे. विशाल आणि त्याची होणारी पत्नी अभिनेत्री अक्षया हिंदळकर यांच्या लग्नाची धामधूम सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
advertisement
3/9
हरिद्वारच्या पावन भूमीवर साखरपुडा उरकल्यानंतर, आता या जोडीच्या हळदीचा शाही सोहळा पार पडला आहे. काही तासांपूर्वीच विशाल आणि अक्षयाने त्यांच्या हळदीचे अत्यंत मनमोहक फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
advertisement
4/9
या फोटोंना त्यांनी दिलेलं कॅप्शनच बरं काही सांगून जातंय, "आज प्रेमाला हळदीचा रंग लागला!" या फोटोंमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद आणि एकमेकांबद्दलचं प्रेम स्पष्टपणे जाणवतंय. एकमेकांच्या गालाला हळद लावतानाचा त्यांचा रोमँटिक अंदाज पाहून फॅन्स अक्षरशः वेडे झाले आहेत.
advertisement
5/9
साधारणपणे हळदीला पिवळे कपडे घातले जातात, पण अक्षयाने इथेही आपली हटके स्टाईल जपली आहे. तिने जांभळ्या रंगाची साडी आणि त्यावर गुलाबी रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान केला होता, तर हातात भरलेला हिरवा चुडा तिचा नववधू लूक आणखीनच खुलवत होता.
advertisement
6/9
विशालने आपली 'सौंदर्या' म्हणजेच अक्षया हिचा चेहरा जगासमोर आणण्यासाठी खूप काळ वाट पाहायला लावली. पण हे नातं जाहीर झालं आणि विशालने थेट लग्नाचा बार उडवून दिला.
advertisement
7/9
हरिद्वारच्या गंगा घाटावर पार पडलेल्या त्यांच्या साखरपुड्याचे फोटो अजूनही लोकांच्या डोळ्यासमोरून हटलेले नाहीत. आता हळदही पार पडल्याने, हे डेस्टिनेशन वेडिंग नक्की कुठे होणार? याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
advertisement
8/9
विशाल आणि अक्षयाची प्रेमकहाणी एखाद्या मालिकेच्या कथेसारखीच आहे. स्टार प्रवाहवरील 'साता जन्माच्या गाठी' या मालिकेच्या सेटवर हे दोघे पहिल्यांदा भेटले. तेव्हा कोणालाच वाटलं नव्हतं की ही ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जीवनसाथी बनतील.
advertisement
9/9
पण खऱ्या अर्थाने या साता जन्माच्या गाठी देवाने तिथेच बांधल्या होत्या. सध्या विशाल 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे, पण खऱ्या आयुष्यात तो आता अक्षयाच्या प्रेमात पूर्णपणे बुडाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्रेमाला हळदीचा रंग लागला! विशाल निकम आणि अक्षया हिंदळकरच्या हळदीचा थाट; 'या' रंगाच्या साडीला नवरीची पसंती
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल