तापातून बरं करण्याची, रक्त शुद्ध करण्याची आणि त्वचा सुधारण्याची शक्ती पपई ह्या अमृतफळामधे आहे. पपई आणि त्याच्या पानांमधे तिन्ही दोष संतुलित करण्याची आणि पचन सुधारण्याची शक्ती आहे.
Skincare : वयानुसार त्वचेची काळजी कशी घ्यायची ? स्पेशल स्किन केअर टिप्स
पपईचे पोषक घटक आणि फायदे - पपई हे सर्व ऋतूंमधे सहज उपलब्ध असलेलं फळ आहे आणि त्यातले एंझाइम, पपेन हे घटक पोट आणि आतड्यांसाठी फायदेशीर आहेत. पचन सुधारण्यात, शरीर शुद्ध करण्यात आणि पोषक घटक शोषण्यासाठी हे गुणधर्म महत्त्वाचे आहेत. त्याची पानं आणि बियांमधे औषधाप्रमाणे गुणधर्म आहेत.
advertisement
केवळ पपईच नाही तर त्याची पानं आणि बिया देखील फायदेशीर आहेत आणि आयुर्वेदात औषध म्हणून वापरली जातात. पानं आणि बिया चवीला थोडी कडू असली तरी ते शरीराच्या अनेक समस्या मुळापासून बऱ्या करण्यासाठी हे उपयुक्त ठरतात.
त्वचेच्या समस्यांसाठी पपईचे फायदे - त्वचेच्या समस्या असतील तर पपईची पेस्ट खाणं आणि लावणं दोन्ही त्वचेसाठी फायदेशीर आहे. यासाठी, पपईच्या लगद्यामधे मध मिसळा आणि ते चेहऱ्यावर लावा. त्वचा घट्ट करण्यासाठी आणि डाग कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. याच्या नियमित वापरामुळे त्वचेवर चांगली चमक येते.
तापावर उपचार करण्यासाठी आणि रक्त शुद्ध करण्यासाठीही याचा उपयोग केला जातो. तापामुळे अशक्तपणा जाणवतो. रक्तातील अशुद्धता वाढली असेल किंवा प्लेटलेट्स कमी झाले असतील तर पपईची पानं पाण्यात उकळून पिणं फायदेशीर आहे. पानांपासून बनवलेला काढा रक्त शुद्ध करतो आणि विविध आजार कमी करण्यास मदत करतो.
रोगप्रतिकारक शक्ती - ताप किंवा संसर्गानंतर रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यास दररोज पपई खाणं फायदेशीर आहे. पपईतील व्हिटॅमिन सीमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या पानांचा रस पिणंही तब्येतीसाठी आवश्यक आहे.
Supplements : चाळिशीच्या टप्प्यावर थकवा का येतो ? जाणून घ्या कारणं आणि उपाय
केस गळतीसाठी फायदेशीर - केस गळतीचा त्रास होत असेल किंवा केस गळत असतील तर पपईच्या बियांच्या पेस्टनं केस मजबूत होऊ शकतात आणि कोरडेपणा दूर होऊ शकतो.
मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम - काही स्त्रियांना मासिक पाळीच्या वेदना खूप होतात. खाण्याच्या चुकीच्या सवयी किंवा शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे वेदना वाढू शकतात. पपई खाल्ल्यानं मासिक पाळीच्या वेदना कमी होण्यासाठी आणि शरीराला आराम मिळण्यासाठी मदत होते.
