Supplements : चाळिशीत थकवा का जाणवतो ? आहारात कोणते बदल करणं गरजेचं ? चाळिशीत supplements घ्याव्यात का ?
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
वयाच्या चाळीशीत, अचानक रोजच्या कामांमुळे थकवा येतो. आपल्या चेहऱ्यावरचं तेज कमी होतं. पाहूयात आहारातले कोणते घटक या टप्प्यावर महत्त्वाचे आहेत.
मुंबई : चाळीशीचा टप्पा, शरीर चक्रामधला महत्त्वाचा टप्पा. वयाच्या चाळीशीनंतर, आपलं शरीर एका नवीन सुरुवातीसाठी तयार असतं. विशेषत: महिलांना थकवा जाणवायला सुरुवात होते. महिला अनेकदा कुटुंब आणि करिअरच्या धावपळीत स्वतःला शेवटच्या स्थानावर ठेवतात.
वयाच्या चाळीशीत, अचानक रोजच्या कामांमुळे थकवा येतो. आपल्या चेहऱ्यावरचं तेज कमी होतं. पाहूयात आहारातले कोणते घटक या टप्प्यावर महत्त्वाचे आहेत.
मॅग्नेशियम ग्लायसीनेट - चाळिशीनंतर बऱ्याच लोकांना झोप चांगली येत नाही. मॅग्नेशियम ग्लायसीनेट हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे शरीराला आणि स्नायूंना आराम मिळतो. ज्यामुळे रात्री गाढ आणि शांत झोप मिळते.
advertisement
ओमेगा- 3 - ओमेगा-3 हे आणखी एक आवश्यक सप्लिमेंट आहे. तज्ज्ञांच्या मते, हा घटक सर्व शरीरासाठी महत्त्वाचं आहे. यामुळे हृदय आणि मेंदू निरोगी राहतोच पण आणि त्वचेसाठीही अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे त्वचा आतून मॉइश्चरायझ राहते, ज्यामुळे चेहऱ्यावर वाढत्या वयाचे परिणाम कमी दिसून येतात.
advertisement
कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी - या वयात हाडांची ताकद हे एक मोठं आव्हान आहे. म्हणून, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी पूरक आहार देखील आवश्यक आहे. व्हिटॅमिन डी शरीराला कॅल्शियम शोषण्यास मदत करतं, ज्यामुळे हाडं मजबूत राहतात आणि भविष्यात सांधेदुखी टाळता येते.
advertisement
ग्लुटाथिओन आणि व्हिटॅमिन सी - वयाच्या चाळिशीनंतर ग्लूटाथिओन आणि व्हिटॅमिन सी यांचं मिश्रण अत्यंत महत्त्वाचं. ग्लुटाथिओन हे "सुपर अँटीऑक्सिडंट" आहे. ताण आणि प्रदूषणामुळे शरीराला होणारं नुकसान कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे प्रकृती निरोगी राहते आणि तुम्ही फ्रेश दिसता.
Plant protein - शरीराची ताकद राखण्यासाठी आहारात Plant protein चा समावेश करा. वयानुसार स्नायू कमकुवत होतात आणि प्रथिनयुक्त पूरक आहारामुळे स्नायू मजबूत ठेवण्यासाठी आणि दिवसभर ऊर्जावान ठेवण्यास मदत करतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 07, 2026 8:32 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Supplements : चाळिशीत थकवा का जाणवतो ? आहारात कोणते बदल करणं गरजेचं ? चाळिशीत supplements घ्याव्यात का ?









