advertisement

Hair Care : केसांची वाढ होईल चांगली, निसर्गाच्या खजिन्यातल्या बिया करतील केसांचं पोषण आणि संरक्षण

Last Updated:

जवसाच्या बिया, चिया सीड्स आणि भोपळ्याच्या बियांमधे ओमेगा-3 फॅटी ॲसिड, प्रथिनं, जीवनसत्त्वं आणि खनिजं आढळतात. यामुळे केसांच्या रोमांना पोषण मिळतंच आणि टाळूही निरोगी राहतो. या बियांमुळे, रक्तप्रवाह वाढतो ज्यामुळे केस लांब आणि जाड होतात.

News18
News18
मुंबई : केस म्हणजे व्यक्तिमत्वाची ओळख. केसांची वाढ चांगली व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा. पण सध्या केसांशी संबंधित समस्या वाढत चालल्यात.
केसांच्या समस्यांवर एक चांगला आणि नैसर्गिक उपाय म्हणजे बिया. या बियांमुळे, शरीर निरोगी राहतंच, शिवाय केसांच्या वाढीलाही मदत होते. जवसाच्या बिया, चिया सीड्स आणि भोपळ्याच्या बियांमधे ओमेगा-3 फॅटी ॲसिड, प्रथिनं, जीवनसत्त्वं आणि खनिजं आढळतात. यामुळे केसांच्या रोमांना पोषण मिळतंच आणि टाळूही निरोगी राहतो. या बियांमुळे, रक्तप्रवाह वाढतो ज्यामुळे केस लांब आणि जाड होतात.
advertisement
केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पोषक घटकांचा साठा भोपळ्याच्या बियांमधे भरपूर प्रमाणात आहे. यात झिंक, मॅग्नेशियम, लोह आणि प्रथिनं असतात, केसांच्या वाढीसाठी हे घटक फायदेशीर मानले जातात. भाजून किंवा सूपमधे आणि सॅलडमध्ये घालून खाऊ शकता.
advertisement
जवसाच्या बियांमधे ओमेगा-3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतं, केसांच्या रोमांचं यामुळे पोषण होतं. त्यामधे लिग्नान्स आणि अँटीऑक्सिडंट्स देखील मोठ्या प्रमाणात असतात, केसांच्या वाढीसाठी हे फायदेशीर आहेत.
आहारात जवसाच्या बियांचा समावेश केल्यानं केसांच्या वाढीला मदत होऊ शकते. स्मूदी आणि सॅलडमधे खाऊ शकता.
advertisement
वजन कमी करण्यासाठी चिया सीड्सचा वापर होतो तसंच यातले ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. यामुळे केसांच्या वाढीला चालना देण्यास मदत होते. स्मूदी किंवा दह्यात मिसळून खाऊ शकता.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair Care : केसांची वाढ होईल चांगली, निसर्गाच्या खजिन्यातल्या बिया करतील केसांचं पोषण आणि संरक्षण
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement