advertisement

Burnout : अतिताणाचा शरीर - मनावर होतो परिणाम, बर्न आऊट होत असल्याचे संकेत शरीर कसं देतं ? बर्न आऊटवर कोणते उपाय करायचे ?

Last Updated:

झोप म्हणजे शरीराची विश्रांतीची वेळ, झोप झाल्यावर फ्रेश वाटतं पण आठ तासांच्या झोपेनंतरही तुम्हाला वेदना होत असतील, अंथरुणातून उठणं आणि नंतरची कामं देखील डोंगर चढल्यासारखी वाटत असतील तर तर ही माहिती काळजीपूर्वक वाचा. या अवस्थेला बर्नआउट म्हटलं जातं. यामागची कारणं समजून घेऊया.

News18
News18
मुंबई : गाणं ऐकताना मधेच थांबता येतं, Pause चं बटण दाबता येतं पण आयुष्यात असं शक्य होतं का ? अशी वेळ तुमच्यावर आली आहे का आणि आली असेल तर तुम्ही काय केलं होतं ?
अरिजीत सिंग, झाकीर खाननं कामातून ब्रेक घेत असल्याचं आणि कामाचं स्वरुप बदलत असल्याचं सांगितलं, त्याची चर्चा अजूनही सुरु आहे. लाखो हृदयांवर राज्य करणारे हे तारे त्यांच्या ग्लॅमरस जगात 'पॉज बटण' दाबू शकतात, तर आपण आपल्या रोजच्या शर्यतीत का थांबत नाही? असा प्रश्न तुमच्याही मनात येतो ?
झोप म्हणजे शरीराची विश्रांतीची वेळ, झोप झाल्यावर फ्रेश वाटतं पण आठ तासांच्या झोपेनंतरही तुम्हाला वेदना होत असतील, अंथरुणातून उठणं आणि नंतरची कामं देखील डोंगर चढल्यासारखी वाटत असतील तर तर ही माहिती काळजीपूर्वक वाचा. या अवस्थेला बर्नआउट म्हटलं जातं. यामागची कारणं समजून घेऊया.
advertisement
बर्नआउट म्हणजे नेमकं काय?
शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या पूर्णपणे थकल्यासारखे वाटतं तेव्हा बर्नआउट होतं. असं घडतं तेव्हा एखाद्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीत रस कमी होतो आणि तरीही ती व्यक्ती सतत काम करत राहते. जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे थकत नाही तोपर्यंत ते लक्षात येत नाही. विशेषतः ज्यांना नेहमी व्यस्त राहणं आवडतं, त्यांना हे कळत नाही की ते त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करत आहेत.
advertisement
सतत झोप येत असेल आणि साधी कामंही पूर्ण करण्यासाठी तासन्तास लागतात. कामावर जाण्याचा विचारच चिंता वाढवतो. क्षुल्लक गोष्टींवरून चिडचीड होणं, छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येणं आणि मित्र आणि कुटुंबापासून स्वतःला दूर ठेवणं. जास्त खाणं किंवा अजिबात न खाणं. अजिबात झोप न येणं किंवा जास्त झोप येणं अशी त्याची लक्षणं असतात. सततच्या ताणामुळे डोकं दुखणं - कपाळावर जडपणा जाणवणं, पोटदुखी किंवा पाठदुखी अशी लक्षणं जाणवतात.
advertisement
बर्नआउट होण्याची कारणं-
विश्रांती न घेता बराच वेळ काम करणं
काम आणि आयुष्यातील संतुलनाचा अभाव
स्वतःकडून अपेक्षांचा अतिरेक
कुठल्याही गोष्टीला 'नाही' म्हणता न येणं
सर्व वेळी फोन/ईमेलद्वारे उपलब्ध असणं
बर्नआउटवर मात करण्यासाठी, काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे:
सतत काम करणं टाळा. थांबा आणि ब्रेक घ्या. मशीनसारखं काम करू नका.
advertisement
ऑफिसचं काम फक्त ऑफिसपुरतं मर्यादित ठेवा. घरी लॅपटॉप आणि ऑफिस कॉल्सपासून दूर रहा.
"नाही" म्हणायला शिकणं तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे.
झोपण्यासाठी, जेवणासाठी आणि मित्रांसोबत वेळ काढा. यामुळे तुमचा मूड फ्रेश होण्यास मदत होईल.
जिममध्ये जा, फिरायला जा किंवा घरी स्ट्रेचिंग करा. व्यायामामुळे तुमचा मूड वाढतो आणि झोप वाढते.
चित्रकला, संगीत किंवा तुम्हाला आवडणाऱ्या इतर गोष्टींसाठी वेळ काढा.
advertisement
जर तुम्हाला खूप समस्या येत असतील तर नक्कीच थेरपिस्ट किंवा कौन्सिलरची मदत घ्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Burnout : अतिताणाचा शरीर - मनावर होतो परिणाम, बर्न आऊट होत असल्याचे संकेत शरीर कसं देतं ? बर्न आऊटवर कोणते उपाय करायचे ?
Next Article
advertisement
Ola, Uber, Rapidoचा उद्या संप; बाईक टॅक्सीपासून कॅबपर्यंत सगळं ठप्प! ‘ऑल इंडिया ब्रेकडाऊन’ आंदोलन,सरकारला दिला अल्टिमेटम
Ola, Uber, Rapidoचा उद्या संप; बाईक टॅक्सीपासून कॅबपर्यंत सगळं ठप्प!
  • उद्या देशव्यापी संप

  • ओला, उबर, रॅपिडोचा 'ऑल इंडिया ब्रेकडाऊन'

  • ओला-उबर चालकांचा गडकरींना 'अल्टिमेटम'

View All
advertisement