स्पा सेंटरवर पोलिसांची छापेमारी, थायलंडच्या पोरी आढळल्या नको त्या अवस्थेत, ठाण्यातील खळबळजनक प्रकार
Last Updated:
Mumbai Crime : मीरा रोडमध्ये एका स्पाच्या आड सुरू असलेला वेश्याव्यवसाय पोलिसांनी उघड केला. छाप्यात अनेक तरुणींची सुटका करण्यात आली असून ३ आरोपींना अटक झाली आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मुंबई : मुंबईच्या मीरा रोडमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. मीरा रोड पूर्व परिसरातील एका स्पाच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. डीसीपी राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पथकाने ही धाड टाकली आहे.
स्पा सेंटरच्या नावाखाली गंदा काम
मिळालेल्या माहितीनुसार,मीरा रोडच्या या स्पामध्ये मसाजच्या आड एक बेकायदेशीररित्या वेश्याव्यवसाय सुरु होता. पोलिसांना त्याबाबतची माहिती मिळाली आणि मग सापळा रचत अचानक छापा टाकला. या कारवाई दरम्यान स्पामध्ये पोलिसांना अनेक संशयास्पद हालचाली ही आढळून आल्या.
स्पाच्या छाप्यामध्ये पोलिसांनी एकूण 14 तरुणींची सुटका केली आहे. ज्यामध्ये काही थायलंडमधील महिलांचा आणि भारतीय तरुणींचाही समावेश होता. या सर्व महिला आणि तरुणींना फसवून किंवा दबावाखाली या व्यवसायात आणल्याची शक्यता पोलिस आहे.
advertisement
पोलिसांनी घटनास्थळावरुन तीन आरोपींना अटक केली असून हे आरोपी स्पा चालवत होते आणि संपूर्ण रॅकेटमध्ये यांचा समावेश असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींविरोधात मीरा रोड पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे.
शिवाय या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत असून या रॅकेटमध्ये अजून कोणी आहे का याचा शोध घेत आहे. मीरा रोड परिसरात अशा प्रकारची घटना समोर आल्याने स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 11:50 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
स्पा सेंटरवर पोलिसांची छापेमारी, थायलंडच्या पोरी आढळल्या नको त्या अवस्थेत, ठाण्यातील खळबळजनक प्रकार







