TRENDING:

APMC Market: लिंबाचे दर घसरले, कांद्याला भाव वाढ नाहीच, केळीची काय स्थिती?

Last Updated:

आखातातील युद्धामुळे केळीसह द्राक्ष, कांदा आणि सर्वच भाजीपाला उत्पादक संकटात आहेत. आज 1 एप्रिल रोजी राज्याच्या मार्केटमध्ये 96 हजार 885 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली: आखातातील युद्धामुळे केळीसह द्राक्ष, कांदा आणि सर्वच भाजीपाला उत्पादक संकटात आहेत. आज 1 एप्रिल रोजी राज्याच्या मार्केटमध्ये 96 हजार 885 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी नागपूर मार्केटमध्ये 2001 क्विंटल पांढर्‍या कांद्याची आवक झाली. त्यास मिळालेला 1375 रुपये आजचा सर्वाधिक कांद्याचा बाजारभाव ठरला. तसेच बाजारातील लाल कांद्याचा सरासरी भाव 575 ते 1263 रुपये दरम्यान राहिला. उन्हाळी कांद्याचा बाजारभाव 850 ते 1000 रुपये दरम्यान प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला.
advertisement

लिंबूची आवक

राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 831 क्विंटल लिंबूची आवक राहिली. यापैकी मुंबई बाजारात आवक झालेल्या 348 क्विंटल लिंबूस 3500 ते 4500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 30 क्विंटल लिंबूस 9750 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

द्राक्ष आवक

राज्याच्या मार्केटमध्ये द्राक्ष आवक वाढली आहे. आज 1227 क्विंटल द्राक्षाची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई बाजारात 680 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास 9500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तसेच सांगली बाजारात आवक झालेल्या 33 क्विंटल द्राक्षास 5000 प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वात कमी बाजारभाव मिळाला.

advertisement

केळीची आवक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाचे दर घसरले, कांद्याला भाव वाढ नाहीच, केळीची काय स्थिती?
सर्व पहा

मुंबई मार्केटमध्ये 31 क्विंटल कच्च्या केळीची आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 2400 ते 3600 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. राज्याच्या मार्केटमध्ये केळीची केवळ 190 क्विंटल एकूण आवक राहिली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये आवक झालेल्या 160 क्विंटल केळीची सर्वाधिक आवक झाली. त्यास 1600 रुपये बाजारभाव मिळाला.

मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: लिंबाचे दर घसरले, कांद्याला भाव वाढ नाहीच, केळीची काय स्थिती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल