advertisement

Agriculture Tips: शेतीला कीड-रोगांचा धोका, उन्हाळ्यात कशी घ्यावी काळजी? पाहा कृषी तज्ज्ञांचा सल्ला, Video

Last Updated:

Agriculture Tips: पिकांना योग्य प्रमाणात पाणी व खत देणे, शेतातील स्वच्छता राखणे आणि पिकांची फेरपालट करणे या उपाययोजनाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत.

+
Agriculture

Agriculture Tips:उन्हाळ्यात शेतीला कीड अन् रोगांचा धोका, कशी घ्यावी काळजी? पाहा कृषी तज्ज्ञांचा सल्ला, Video

बीड: उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमुळे राज्यातील शेतीवर विविध प्रकारच्या कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. तापमानातील वाढ, पाण्याची कमतरता आणि कोरडे हवामान यामुळे पिकांची प्रतिकारशक्ती कमी होते, परिणामी कीड व रोगांना पोषक वातावरण तयार होते. सध्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. कृषी क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले बीडमधील अभ्यासक लहू चव्हाण यांनी लोकल18 च्या माध्यमातून शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
उन्हाळ्यात या रोगांचा धोका
उन्हाळ्यात मावा, थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. या किडी पिकांच्या पानांवर व देठांवर आक्रमण करून त्यातील रस शोषून घेतात, ज्यामुळे पिकांची वाढ खुंटते. त्याचबरोबर बुरशीजन्य रोगांमुळे पानांवर डाग, करपा आणि वाळण्याच्या समस्या निर्माण होतात, ज्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो.
advertisement
शेतकऱ्यांनी काय करावं?
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नियमित पिकांची पाहणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुरुवातीच्या टप्प्यातच कीड-रोगांची लक्षणे ओळखल्यास त्यावर वेळेत नियंत्रण मिळवणे शक्य होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात नियमित फेरफटका मारून पिकांची स्थिती तपासणे अत्यावश्यक ठरते, असे एका नामांकित कंपनीत असणारे कृषी अभ्यासक चव्हाण सांगतात.
एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) पद्धतीचा अवलंब केल्यास कीड-रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते. नीम अर्क फवारणी, फेरोमोन ट्रॅप्सचा वापर आणि गरजेनुसार शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा योग्य प्रमाणात वापर करणे आवश्यक आहे. सेंद्रिय उपाययोजना केल्यास पिकांची गुणवत्ता टिकून राहण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले.
advertisement
खत, पाण्याचं व्यवस्थापन
याशिवाय, पिकांना योग्य प्रमाणात पाणी व खत देणे, शेतातील स्वच्छता राखणे आणि पिकांची फेरपालट करणे या उपाययोजनाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. योग्य नियोजन आणि वेळेवर उपाययोजना केल्यास शेतकरी उन्हाळ्यातील कीड-रोगांच्या संकटावर मात करून चांगले उत्पादन मिळवू शकतात, असेही लहू चव्हाण यांनी स्पष्ट केले.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Agriculture Tips: शेतीला कीड-रोगांचा धोका, उन्हाळ्यात कशी घ्यावी काळजी? पाहा कृषी तज्ज्ञांचा सल्ला, Video
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement