Bank holiday: ATM मध्ये खडखडाट, सर्व्हर डाउन...नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात 3 दिवस बँक बंद
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Bank holidays: नोव्हेंबर महिन्यात 13 दिवस बँक बंद राहणार आहे. यातल्या काही सुट्ट्या हा संपूर्ण देशभरात तर काही सुट्ट्या या त्या त्या राज्यानुसार असणार आहेत.
advertisement
1/7

सण-उत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बँकांनाही सुट्टी आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सलग तीन दिवस बँक बंद असणार आहे. सप्ताहिक सुट्टी आणि सणवार यामुळे सलग तीन दिवस बँक बंद असणार आहे.
advertisement
2/7
RBI प्रत्येक महिन्यातील सुट्ट्यांच्या तारखा जाहीर करते. यानुसार नोव्हेंबर महिन्यात 13 दिवस बँक बंद राहणार आहे. यातल्या काही सुट्ट्या हा संपूर्ण देशभरात तर काही सुट्ट्या या त्या त्या राज्यानुसार असणार आहेत. त्यामुळे ब्रांचमध्ये जाण्यापूर्वी हॉलिडे लिस्ट चेक करा.
advertisement
3/7
1 नोव्हेंबर- दिवाळी, कुट महोत्सव आणि कन्नड राज्योत्सवानिमित्त त्रिपुरा, कर्नाटक, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्र, मेघालय, सिक्कीम आणि मणिपूरमध्ये बँका बंद राहतील.
advertisement
4/7
2 नोव्हेंबर- गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड, सिक्कीम, राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये दिवाळी (बली प्रतिपदा) / बलीपद्यामी / लक्ष्मी पूजा (दीपावली) / गोवर्धन पूजा / विक्रम संवत नवीन वर्षाच्या दिवशी बँका बंद राहतील.
advertisement
5/7
3 नोव्हेंबर- रविवार आणि 7 नोव्हेंबर- बंगाल, बिहार, झारखंड या राज्यांमध्ये छठ (संध्याकाळी अर्घ्य) निमित्त बँका बंद राहतील. 8 नोव्हेंबर- बिहार, झारखंड आणि मेघालय सारख्या राज्यांमध्ये छठ (सकाळी अर्घ्य)/वंगला उत्सवानिमित्त बँका बंद राहतील.
advertisement
6/7
9 नोव्हेंबर- महिन्याचा दुसरा शनिवार त्यामुळे सर्व बँका बंद राहणार आहेत. 10 नोव्हेंबर - रविवार असल्याने बँका बंद राहतील. 8 ते 10 सलग तीन दिवस बँक बंद राहिल्याने ATM मध्ये खडखडाट राहण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
जरी बँका बंद असल्या तरी तुमचे छोटे व्यवहार, पैसे ट्रान्सफर करणे, पेमेंट करणे यासारख्या गोष्टी ऑनलाईन बँकिंगच्या मदतीने होऊ शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Bank holiday: ATM मध्ये खडखडाट, सर्व्हर डाउन...नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात 3 दिवस बँक बंद