FASTag Annual Pass 2026: नॅशनल हायवेवर फिरणं आता महाग, १ एप्रिलपासून कार चालकांना मोजावे लागणार जास्त पैसे
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
इराण-इस्रायल युद्धामुळे आधीच महागाई वाढली आहे. त्यात गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेर जायचा प्लॅन करत असाल तर फिरणंही खिशाला कात्री लावणारं ठरणार आहे. याचं कारण म्हणजे सरकारने मोठे निर्णय घेतला. ज्याचा फटका थेट फास्टॅग भरणाऱ्यांना बसणार आहे.
advertisement
1/6

१ एप्रिलपासून सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र एक छोटासा झटका बसणार आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने फास्टॅगच्या ॲन्युअल पास शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांच्याकडे स्वतःची कार आहे आणि जे कामानिमित्त किंवा पर्यटनासाठी वारंवार राष्ट्रीय महामार्गाचा वापर करतात, अशा लोकांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे.
advertisement
2/6
जर तुम्ही कामानिमित्त किंवा फिरण्यासाठी वारंवार हायवेवरून कारने ये-जा करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने (NHAI) तुमच्या खिशाला थोडा चाट दिलाय. १ एप्रिल २०२६ पासून फास्टॅगचा जो वार्षिक पास आपण काढतो, त्याचे दर वाढवण्यात आले आहेत.
advertisement
3/6
आतापर्यंत आपण ३,००० रुपये भरले की वर्षभरासाठी किंवा २०० वेळा टोल क्रॉस करण्यासाठी आपल्याला टेन्शन नसायचं. पण नव्या आर्थिक वर्षात, म्हणजे १ एप्रिलपासून याच पाससाठी तुम्हाला ३,०७५ रुपये मोजावे लागतील. म्हणजे सरळ सरळ ७५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
advertisement
4/6
तुम्हाला वाटेल की ७५ रुपये तर आहेत, काय फरक पडतो? पण विचार करा, देशात तब्बल ५६ लाखांहून अधिक लोक हा 'वार्षिक पास' वापरतात. खास करून ज्यांची घरं हायवेच्या जवळ आहेत किंवा ज्यांना रोज कामानिमित्त टोल नाका ओलांडावा लागतो, अशा कार, जीप आणि व्हॅन मालकांसाठी हा पास म्हणजे मोठा दिलासा असतो. आता याच लोकांसाठी सरकारनं नवीन दर लागू केले आहेत.
advertisement
5/6
जर तुम्ही रोज टोल भरून जात असाल तर तुमचे 10 हजार रुपये वर्षाचे जातात. त्याऐवजी जर तुम्ही पास काढला तर तुमचे 7000 रुपये वाचतात. त्यामुळे हा पास रोज राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. मात्र त्यामध्ये थोडीशी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
advertisement
6/6
उगाच टोलवर रांगेत उभं राहून चौकशी करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनही हा पास अपडेट करू शकता. राजमार्ग यात्रा ॲप किंवा NHAI च्या वेबसाईटवर जा. गाडीचा नंबर आणि फास्टॅग आयडी टाकून लॉगिन करा. नवीन दराप्रमाणे (३,०७५ रुपये) पेमेंट करा. पेमेंट झाल्यावर २ तासांत तुमचा पास चालू होईल आणि तुम्हाला मेसेज येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
FASTag Annual Pass 2026: नॅशनल हायवेवर फिरणं आता महाग, १ एप्रिलपासून कार चालकांना मोजावे लागणार जास्त पैसे