TRENDING:

Gold Loan घेताय? 'या' 4 गोष्टी ठेवा लक्षात! अगदी स्वस्तात मिळेल कर्ज, वाचतील पैसे

Last Updated:
Gold Loan Tips : गोल्ड लोन हे सर्वात सुरक्षित आणि सहज मिळणालं लोन मानलं जातं. ज्यावेळी आपल्याला पैशांची सर्वाधिक गरज असते तेव्हा सोनं हे उपयुक्त ठरतं.
advertisement
1/7
Gold Loan घेताय? 'या' 4 गोष्टी ठेवा लक्षात! अगदी स्वस्तात मिळेल कर्ज, वाचतील पैसे
मुंबई : आपण पैशांचं खुप नियोजन करत असतो. अगदी काटकसरीने वापरही करतो. पण कधीकधी अचानक पैशांची गरज पडते आणि आपल्याकडे पैसे नसतात. अशावेळी गोल्ड लोन हे खुप उपयुक्त ठरतं. कारण हे सहज मिळतं आणि सुरक्षितही मानलं जातं. एवढंच नाही तर पर्सनल लोनच्या तुलनेत हे स्वस्तही असतं. पण काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्हाला ते आणखी स्वस्तात मिळू शकतं.
advertisement
2/7
गरज असेल तरच कर्ज घ्या : तुम्ही गोल्ड लोन घेण्यापूर्वी विचार करायला हवा की, तुम्ही ते कोणत्या कामासाठी घेत आहात. सोनं ही तुमची संपत्ती आहे, म्हणून खुप गरज असेल तेव्हाच गोल्ड लोन घेण्याचा निर्णय घ्या. कोणी आजारी असेल आणि उपचारासाठी तुम्हाला पैसे हवे असतील तर गोल्ड लोन घेऊ शकता. लग्नकार्य असेल किंवा शिक्षणासाठी लागत असेल, खुपच गरज असेल तरच कर्ज घ्या.
advertisement
3/7
गोल्ड लोन कुठून घेताय ते आधी पाहा : गोल्ड लोन हे बँका, नॉन बॅकिंग फायनेन्स कंपन्याही देतात. पण बँकेत कमी व्याजदरावर गोल्ड लोन मिळतं. तसंच NBFC मध्ये जास्त व्याज घेतलं जातं. कारण त्यांचा मुख्य बिझनेसच गोल्ड लोन देणं असतं. म्हणूनच तिथे तुमचं लोन लवकर अप्रूव्ह होतं. तसंच कर्जाची रक्कमही जास्त मिळते. पण यावर तुम्हाला व्याज द्यावं लागू शकतं. म्हणूनच बँकेकडूनच गोल्ड लोन घ्या.
advertisement
4/7
लोन घेण्यापूर्वी या गोष्टींचा करा विचार : गोल्ड लोन आपण ठरलेल्या वेळेत फेडले नाही तर संस्था गहाण ठेवलेल्या सोन्यावर अधिकार दाखवते. सामान्यतः बँका 3 महिने ते 3 वर्षांपर्यंत गोल्ड लोन देतात. NBFC मध्ये गोल्ड लोनचं टेन्योरही वेगळं असू शकतं. म्हणूनच तुम्ही लोन किती काळासाठी घेत आहात आणि ते कधी परत करु शकता याचं कॅलक्युलेशन करुनच लोन घ्या. अन्यथा जास्त पैसे मोजावे लागू शकतात.
advertisement
5/7
या स्थिती कर्जदाता अतिरिक्त सोनं मागू शकतो : तुम्ही जे गोल्ड गहाण ठेवलेय, त्यावर वित्तीय संस्थेने गोल्डच्या मार्केट किंमतीच्या आधारावर तुम्हाला कर्ज दिलं असेल. लोन घेतल्यानंतर मध्येच सोन्याचा भाव कमी झाला, तर अशावेळी कर्जदाता तुमच्याकडून आणखी सोनं गहाण ठेवण्यासही सांगू शकतो. गोल्ड लोन घेण्यासाठी वय 18 ते 75 वर्षांच्या दरम्यान असायला हवेत. या व्यतिरिक्त गोल्ड लोनमध्येही दुसऱ्या सामान्य लोन प्रमाणे प्रोसेसिंग फीस लागते. जी बँका आणि NBFC च्या हिशोबाने वेगवेगळी असते.
advertisement
6/7
गोल्ड लोनचे फायदे काय? : पर्सनल लोन, प्रॉपर्टी लोन, कॉर्पोरेट लोनच्या तुलनेत गोल्ड लोन स्वस्त असतं. दुसऱ्या लोनच्या तुलनेत गोल्ड लोनसाठी क्रायटेरिया सोपा असतो.
advertisement
7/7
गोल्ड लोनमध्ये क्रेडिट स्कोअर जास्त महत्वाचा ठरत नाही. कारण तुम्ही लोनची रक्कम गोल्डच्या रकमेच्या हिशाबाने घेता. आपात्कालिन परिस्थितीत तत्काळ पैशांची गरज असेल तर गोल्ड लोन फायदेशीर ठरते. कारण हे शॉर्ट नोटिसवर मिळतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold Loan घेताय? 'या' 4 गोष्टी ठेवा लक्षात! अगदी स्वस्तात मिळेल कर्ज, वाचतील पैसे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल