TRENDING:

Gold Silver Price: अमेरिका-इराण युद्धामुळे 12 तासांत पुन्हा सोनं-चांदी महाग, आणखी किती वाढणार?

Last Updated:
इस्रायल अमेरिका विरुद्ध इराण युद्धामुळे सोन्या चांदीचे दर झपाट्याने वाढले असून शेअर मार्केट घसरले आहे. Comex वर सोनं ५३४० डॉलर्स प्रति औंसवर पोहोचले.
advertisement
1/7
अमेरिका-इराण युद्धामुळे 12 तासांत पुन्हा सोनं-चांदी महाग, आणखी किती वाढणार?
इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराण असा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. तिसऱ्या महायुद्धाचे संकेत मिळत असताना आता एक मोठी बातमी समोर येत आहे. होळी आणि लग्न सराईच्या आधी सोन्या चांदीचे दर पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. युद्धसंघर्षामुळे शेअर मार्केट आपटलं आहे. तर डिफेन्स स्टॉककडे लोक वळत आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोक सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करत आहेत.
advertisement
2/7
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे सोन्या-चांदीच्या दराने मोठी उसळी घेतली. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, मध्यमवर्गीयांच्या तोंडचं पाणी पळालं.
advertisement
3/7
२८ फेब्रुवारीपासून इराण आणि इस्रायलमध्ये प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली. इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केले, तर इस्रायल आणि अमेरिकेनेही इराणला जशास तसं उत्तर दिलंय. या युद्धामुळे जगात भीतीचं वातावरण आहे. जेव्हा युद्धासारखी परिस्थिती येते, तेव्हा मोठे गुंतवणूकदार शेअर मार्केटमधला पैसा काढून तो सोन्यात गुंतवतात. कारण सोनं ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. याच कारणामुळे आज सोन्याचे भाव प्रचंड वाढले आहेत.
advertisement
4/7
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत Comex सोन्याचे भाव आज १.७५ टक्क्यांनी वधारले आहेत. आज सोन्याचा भाव ५,३४० डॉलर्स प्रति औंस एवढा झाला आहे. विशेष म्हणजे, आज सकाळी मार्केट उघडलं तेव्हा हा भाव ५,४०० डॉलर्सच्याही वर गेला होता. शुक्रवारी हाच भाव ५,२९६ डॉलर्स होता. चांदीच्या दरातही वाढ झाली असून ती ९३.५६ डॉलर्स प्रति औंसवर पोहोचली आहे.
advertisement
5/7
मार्केट तज्ज्ञ अनुज गुप्ता यांनी आधीच अंदाज वर्तवला होता की, युद्धाच्या बातम्यांमुळे सोमवारी बाजार उघडताच सोन्यात मोठी तेजी येईल. त्यांचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. त्यांच्या मते, जोपर्यंत युद्धाचा तणाव कमी होत नाही, तोपर्यंत भाव कमी होण्याची शक्यता कमीच आहे.
advertisement
6/7
१ ग्रॅम सोन्यासाठी भारतात १७ हजार ३०९ रुपये २४ कॅरेटसाठी मोजावे लागणार आहेत. तर २२ कॅरेटसाठी १५ हजार ८६६ रुपये मोजावे लागणार आहेत. १८ कॅरेट सोन्यासाठी १२ हजार ९८२ रुपये मोजावे लागणार आहेत. चांदीचे दर पुन्हा 3 लाख रुपये प्रति किलोच्या दिशेनं जात आहेत.
advertisement
7/7
१२ तासांत सोन्याचे दर ११ हजार तर चांदीचे दर २५ हजार रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सोन्या चांदीच्या दरांमध्ये मोठी उसळली पाहायला मिळाली आहे. सोन्या चांदीच्या दरातील गुंतणूक देखील वाढत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold Silver Price: अमेरिका-इराण युद्धामुळे 12 तासांत पुन्हा सोनं-चांदी महाग, आणखी किती वाढणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल