Gold-Silver Price: आज काय सुरु आहेत सोन्या-चांदीचे भाव? वाढले की कमी झाले करा चेक
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Gold-Silver Price Today: आज सोन्याच्या किंमतींमध्ये बुधवारच्या तुलनेत थोडी घसरण पाहायला मिळाली आहे. तर चांदीचा भाव कमी झालाय की वाढला चला पाहूया...
advertisement
1/6

Gold-Silver Price Today: सोन्याच्या किंतींमध्ये गेल्या 7 दिवसांपासून तेजी पाहायला मिळत होती. मात्र या तेजीवर आज ब्रेक लागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये वाढती भू-राजकिय अनिश्चितता आणि अमेरिकेतील व्यापाराबाबत वाढत्या चिंतेमध्ये, सोने आणि चांदीच्या किमती सतत वाढत होत्या. आज गुरुवारी 26 फेब्रुवारीला सोनं-चांदीच्या किंमतींमध्ये किरकोळ घसरण पाहायला मिळाली आहे.
advertisement
2/6
आज किती आहे सोन्याची किंमत? : आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,61,680 रुपये प्रति 10 ग्राम आहे. जी कालच्या तुलनेत 210 रुपये कमीआहे. काल म्हणजेच बुधवारी सोन्याची किंमत 1,61,890 रुपये होती.
advertisement
3/6
22 कॅरेट सोन्याची किंमत आज प्रति 10 ग्रामच्या हिशोबाने 1,48,200 रुपये आहे. यामध्येही बुधवारच्या तुलनेत 200 रुपयांची घसरण झाली आहे. एक दिवसआधी 10 ग्रामच्या 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,48,400 रुपये होती. अशा प्रकारे 10 कॅरेट सोन्याची किंमत कालच्या 1,21,420 रुपयांच्या तुलनेत 160 रुपयांनी स्वस्त होऊन 1,21,260 रुपये प्रति 10 ग्राम वर पोहोचली आहे.
advertisement
4/6
बुधवारी किंमत किती वाढली? : गुड रिटर्न्सच्या मते, बुधवारी भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम अंदाजे 11 रुपयांनी वाढून 16,189 रुपये झाली. गेल्या सात दिवसांत 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम अंदाजे 705 रुपयांनी वाढली आहे, म्हणजेच या काळात 100 ग्रॅमची किंमत अंदाजे 70,500 रुपयांनी वाढली आहे. त्याचप्रमाणे, बुधवारी भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 10 रुपयांनी वाढून 14,840 रुपयांवर पोहोचली आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 8 रुपयांनी वाढून 12,142 रुपयांवर पोहोचली.
advertisement
5/6
आजचा भाव किती आहे? : आज मुंबई, कोलकाता, हैदराबाद, केरळ, बेंगळुरू, पुणे, नागपूर, भुवनेश्वर, विजयवाडा येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 16,168 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा भाव 14,820 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव 12,126 रुपये प्रति ग्राम आहे.
advertisement
6/6
चांदीची किंमत किती? : आज 26 फेब्रुवारीला चांदीच्या किंमतीतही घसरण नोंदवण्यात आली आहे. MCX वर चांदीच्या किंमतीत 1-1.2 टक्के घसरण झाली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकातासारख्या प्रमुख शहरांमध्ये चांदीचा भाव 2,84,900 रुपये आहे. ज्यामध्ये कालच्या तुलनेत प्रति किलो 100 रुपये घसरण झाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold-Silver Price: आज काय सुरु आहेत सोन्या-चांदीचे भाव? वाढले की कमी झाले करा चेक