Gold Silverच्या किंमतीत मोठी घसरण! चांदी 4 हजारांनी स्वस्त, पाहा सोन्याचा भाव काय?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. दरम्यान आज मौल्यवान धातूंच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. चला पाहूया काय सुरू आहे भाव...
advertisement
1/7

नवी दिल्ली : लग्नसराई सुरू झाली आहे. या काळात भारतात सोन्याच्या मागणीत प्रचंड वाढ होते. दरम्यान सोनं खरेदीदारांसाठी गुड न्यूज आहे. कारण सोन्या-चांदीच्या किंमतीत आज घसरण पाहायला मिळाली.
advertisement
2/7
ग्लोबल मार्केटमध्ये सुरू असलेल्या उलथा-पालथचा परिणाम एमसीएक्सवर स्पष्ट दिसतोय. सोमवारी 16 मार्च 2026 ला बाजार ओपन होताच सोने आणि चांदीच्या किंमतीमध्य मोठी घसरण नोंदवण्यात आली. मिडिल ईस्टच्या तणाव आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर मजबुत होत असताना भारतीय गुंतवणूकदारांनी आज विक्री करण्यास प्राधान्य दिले आहे.
advertisement
3/7
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्याच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळाली. सोनं आज 1.03 टक्क्यांच्या घसरणीसह ओपन झालं आहे. प्रति 10 ग्राम सोन्याच्या भावात 1,626 रुपयांची मोठी घसरण झाली.
advertisement
4/7
सोन्यामध्ये झालेल्या या घसरणीनंतर एमसीएक्सवर सोनं हे 1,56,840 रुपये प्रति 10 ग्रामच्या स्तरावर व्यवहार करत आहे.
advertisement
5/7
चांदीच्या किंमतीही खाली घसरल्या आहेत. चांदीमध्ये तर सोन्यापेक्षा जास्त घसरण पाहायला मिळाली आहे. चांदीच्या भावात आज 1.56 टक्के मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. ज्यामुळे आज चांदीच्या भाव हा तब्बल 4 हजारांहून जास्तने कमी झाला आहे. आता चांदीचा भाव हा 2,55,394 रुपये प्रति किलोग्रामवर आला आहे.
advertisement
6/7
ही मोठी घसरण का? : विशेषज्ञांनुसार, International Gold Prices ही 5,000 डॉलर्सने खाली आली आणि Silver Spot Prices मध्ये 2%हून जास्त कमी आल्याने थेट भारतीय एमसीएक्सवर परिणाम झाला आहे.
advertisement
7/7
मिडिल ईस्ट संकटा दरम्यान गुंतवणूकदारांद्वारे 'प्रॉफिट बुकिंग' आणि जागतिक बँका व्याजदरात कपात करण्याची शक्यता कमी असल्याने मौल्यवान धातूंच्या किमती दबावाखाली आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold Silverच्या किंमतीत मोठी घसरण! चांदी 4 हजारांनी स्वस्त, पाहा सोन्याचा भाव काय?