TRENDING:

सलग दुसऱ्या दिवशी चांदीच्या भावात वाढ! सोनं झालं स्वस्त, पाहा किंमती

Last Updated:
सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये या आठवड्यात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज 19 फेब्रुवारीला एमसीएक्सवर सोन्याचा भाव थोडा कमी झाला आहे.
advertisement
1/8
सलग दुसऱ्या दिवशी चांदीच्या भावात वाढ! सोनं झालं स्वस्त, पाहा किंमती
Gold Silver Prices Today: सोनं आणि चांदीच्या किंमतींमध्ये या आठवड्यात चढ-उतार पाहायला मिळाले. आज 19 फेब्रुवारीला एमसीएक्सवर सोन्याचा भाव 20 रुपये प्रति 10 ग्रामने खाली आला आहे. तर चांदीमध्ये 149 रुपये प्रति किलोग्रामने तेजी दिसतेय.
advertisement
2/8
आज सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 155741 रुपये आहे आणि चांदीचा दर प्रति किलो 244417 रुपये आहे.
advertisement
3/8
स्पॉट गोल्डच्या किंमतींमध्ये किरकोळ घसरण पाहायला मिळाली. ही जवळपास 4,980 डॉलरच्या आसपास होती. जी अजुनही 5,000 डॉलरच्या स्तरावर खाली आहे. तसंच आशियाई बाजारात स्पॉट सिल्व्हरच्या किंमतीत सुधारणा झाली आहे. ते पुन्हा 76 डॉलर प्रति औंसच्या स्तरावर पोहोचले आहे.
advertisement
4/8
वेगवेगळ्या शहरात सोन्या-चांदीचा भाव : दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,54,340 रुपये प्रति 10 ग्राम आहे. या व्यतिरिक्त लखनऊ, जयपूरमध्येही हाच भाव आहे. मुंबई, बेंगळुरु, हैद्राबादमध्ये 24 कॅरेट प्रति 10 ग्रामचा भाव 1,54,190 रुपयांवर आला आहे.
advertisement
5/8
एक्सपर्टचं सोन्याविषयी मत : मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) ने 18 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:30 वाजताच्या दर सत्रात सोन्याचा बेंचमार्क भाव प्रति 10 ग्रॅम 1,51,963 रुपये असा निश्चित केला, जो मागील बंदपेक्षा 0.51 टक्के जास्त आहे. हे दर रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सॉवरेन गोल्ड बाँड (SGB) चे मूल्य निश्चित करण्यासाठी आधार बनवतात, जे मागील आठवड्याच्या सरासरी बंद किंमतीच्या आधारे मोजले जाते.
advertisement
6/8
एलकेपी सिक्योरिटीजचे व्हीपी रिसर्च अॅनालिस्ट (कमोडिटी आणि करेन्सी)Jateen Trivedi यांनी म्हटले की, सध्याचा ट्रेंड अजुनही कमकुवत दिसत आहे. कारण यामध्ये सतत 'लोअर हाय' आणि 'लोअर लो'चा पॅटर्न आहे.
advertisement
7/8
त्यांच्या मते, सीएमईवर 5,000 डॉलर च्या वरचा मजबूत ब्रेकआउटच ही कमकुवतपणा संपवू शकतो आणि तेजीचा ट्रेंड पुनर्संचयित करू शकतो. सध्या, सोन्यासाठी तात्काळ आधार सुमारे 1,48,000 रुपये आहे, तर मजबूत रेजिस्टेंस 1,55,000 रुपयांवर कायम आहे.
advertisement
8/8
18 फेब्रुवारीला जारी Augmont Bullion च्या रिपोर्टनुसार, गुंतवणूकदारांची सुरक्षित गुंतवणूकची पसंत कमी झाल्याने सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. सध्याच्या दिवसात भू-राजकिय तणाव काही प्रमाणात स्थिर आहे. यामुळे मौल्यवान धातूंमध्ये संरक्षणात्मक गुंतवणुकीची गरज कमी झाली आहे. म्हणूनच काही गुंतवणूकदारांनी अलिकडच्या तेजीनंतर नफा बुक करणे पसंत केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
सलग दुसऱ्या दिवशी चांदीच्या भावात वाढ! सोनं झालं स्वस्त, पाहा किंमती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल