Gold Rate Hike: सोन्या-चांदीने सगळेच विक्रम तोडले, आज 24 कॅरेटला किती रुपये मोजावे लागणार?
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Gold Silver Rate Today: गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरांत विक्रमी वाढ झालीये. आज सोनं 90 हजार तर चांदी 1 लाखांवर गेलीये.
advertisement
1/7

जगभरातील आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेमुळे सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे. परिणामी देशांतर्गत सराफ बाजारात सोन्यासह चांदीच्या किमतीने एक नवीन विक्रम केला आहे.
advertisement
2/7
गेल्या आठवड्यात सोने 1300 रुपयांनी महागले. तर या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात एका दिवसात 1300 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील काळात सोन्याचे दर आणखी वाढण्याची चेन्हे आहेत.
advertisement
3/7
ऐन लग्नसराईमध्येच सोन्याचे दर गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सोमवारी नाशिक सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झालीये. तर चांदीने देखील नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
advertisement
4/7
नाशिकमध्ये सोन्याने प्रति 10 ग्रॅम 1300 रुपयांनी वाढ नोंदवत नवीन विक्रमी पातळी गाठली. ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या मते, 99.99 टक्के शुद्धतेचे सोने सलग चौथ्या दिवशी वधारले आहे. आज सोन्याची किंमत 1300 रुपयांनी वाढून 90,750 रुपये प्रति 10 ग्रॅम या नवीन उच्चांकावर पोहोचली.
advertisement
5/7
गुरुवारी सोन्याचे दर 89 हजार 450 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. 22 कॅरेट (दागिन्यांचे सोने) सोन्याचा सरासरी किरकोळ भावही 1153 रुपयांनी वाढून 80,701 रुपये प्रति 10 ग्रॅम या विक्रमी पातळीवर पोहोचला. शुक्रवारी महाराष्ट्रात धुलिवंदनानिमित्त सराफा बाजार बंद होता.
advertisement
6/7
सराफा बाजारात चांदीच्या किमतीत देखील मोठी वाढ झालीये. आज प्रतिकिलो चांदी 1300 रुपांनी वाढून 1 लाख 2 हजार 500 रुपयांच्या विक्रमी दरावर गेलीये. गुरुवारी चांदीचा दर 1 लाख 1 हजार 200 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता.
advertisement
7/7
सध्या जगभरातील मध्यवर्ती बँका सर्वाधिक सोने खरेदी करत आहेत. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढत आहे, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) सौमिल गांधी यांनी सांगितले. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार आणि आर्थिक धोरणांमुळे सोन्या-चांदीच्या बाजारात तेजी आलीये.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold Rate Hike: सोन्या-चांदीने सगळेच विक्रम तोडले, आज 24 कॅरेटला किती रुपये मोजावे लागणार?