TRENDING:

Fastag Rue: फास्टॅगसाठी सरकारकडून नवा नियम, KYV ची अट पूर्ण न केल्यास होणार बंद

Last Updated:
सरकारने फास्टॅगसाठी KYV म्हणजे Know Your Vehicle पडताळणी अनिवार्य केली आहे. प्रक्रिया पूर्ण न केल्यास फास्टॅग बंद होईल आणि टोल कॅशमध्ये भरावा लागेल.
advertisement
1/7
फास्टॅगसाठी सरकारकडून नवा नियम, KYV ची अट पूर्ण न केल्यास होणार बंद
जर तुम्ही नियमितपणे महामार्गावरून प्रवास करत असाल आणि टोल भरण्यासाठी फास्टॅग वापर करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आतापर्यंत फक्त KYC आवश्यक होते, पण सरकारने फास्टॅगमध्ये होणारे संभाव्य गैरव्यवहार आणि फसवणूक थांबवण्यासाठी एक नवीन नियम लागू केला आहे. आता प्रत्येक वाहनासाठी KYV पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
advertisement
2/7
KYV म्हणजे 'Know Your Vehicle' वाहनाची पडताळणी. या प्रक्रियेचा मुख्य उद्देश तुमचा फास्टॅग त्याच वाहनावर व्यवस्थित लावलेला आहे की नाही हे पाहण्याचा आहे. ज्या वाहनाच्या नावावर तो जारी झाला त्या वाहनावर तो नसेल तर ती फसवणूक आहे.
advertisement
3/7
एकाच फास्टॅगचा वापर दुसऱ्या वाहनावर केला जात नाहीये ना, याची तपासणी करणे हा यामागचा उद्देश आहे. जर तुम्ही ही KYV पडताळणी वेळेत पूर्ण केली नाही, तर तुमचा फास्टॅग काम करणे बंद होईल. त्यामुळे तुम्हाला टोल प्लाझावर फास्टॅग वापरता येणार नाही.
advertisement
4/7
तुम्हाला संपूर्ण टोल शुल्क कॅशमध्ये भरावं लागू शकतं. त्यामुळे अनावश्यक त्रास टाळण्यासाठी आणि तुमच्या फास्टॅगचे फायदे सुरू ठेवण्यासाठी ही प्रक्रिया लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे. KYV प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवावी लागतील
advertisement
5/7
वाहनाचे आरसीची डिजिटल कॉपी, गाडीचा नोंदणी क्रमांक (VRN), चेसिस नंबर आणि तुमच्या मोबाईल नंबरशी जोडलेले फास्टॅग खात्याचे तपशील. ही सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असल्यास, तुम्ही अगदी सहजपणे घरबसल्या मोबाईलवरून ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.
advertisement
6/7
तुमच्या बँकिंग ॲपमध्ये किंवा Fastag ॲपमध्ये जाऊन तुम्हाला 'KYV' किंवा 'Fastag Verification' असा पर्याय शोधावा लागेल. त्यानंतर स्क्रीनवर दिलेल्या सूचनांनुसार, वेगवेगळ्या अँगलने काढलेले वाहनाचे स्पष्ट फोटो अपलोड करावे लागतील. एक फोटो असा असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये फास्टॅग गाडीच्या विंडशील्डवर योग्यरित्या लावलेला दिसत असेल.
advertisement
7/7
सोबतच, RC ची स्कॅन केलेली प्रत अपलोड करून 'सबमिट' करावे लागेल. ही संपूर्ण पडताळणी प्रक्रिया पूर्ण होण्यास साधारणपणे ७ दिवसांपर्यंत वेळ लागू शकतो आणि तुमच्या फास्टॅगचे स्टेटस तुम्हाला ईमेल किंवा एसएमएसद्वारे कळवले जाईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Fastag Rue: फास्टॅगसाठी सरकारकडून नवा नियम, KYV ची अट पूर्ण न केल्यास होणार बंद
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल