नवीन वर्षात स्मॉल सेव्हिंगवर किती मिळणार व्याज? सरकारने घेतलेला मोठा निर्णय, तुमच्या खिशावर होणार परिणाम
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
सरकारने पीपीएफ, सुकन्या समृद्धी, एनएससीसह सर्व स्मॉल सेव्हिंग स्कीम्सचे व्याजदर जैसे थे ठेवले, त्यामुळे गुंतवणूकदारांना मार्च २०२६ पर्यंत कोणताही बदल मिळणार नाही.
advertisement
1/6

नवीन वर्ष आलं की आपल्याला आशा असते की काहीतरी चांगलं घडेल. गुंतवणुकीच्या बाबतीतही मध्यमवर्गीय माणूस विचार करत असतो की, पीपीएफ किंवा सुकन्या समृद्धीसारख्या योजनांतून आता थोडा जास्त परतावा मिळेल. पण, सरकारने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांच्या पदरी एकप्रकारे निराशाच टाकली आहे.
advertisement
2/6
पीपीएफ, एनएससी आणि सुकन्या समृद्धीसह सर्व 'स्मॉल सेव्हिंग स्कीम्स'चे व्याजदर आहे तसेच ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. लगातार सातव्यांदा 'जैसे थे' परिस्थिती बुधवारी अर्थ मंत्रालयाने याबद्दलची अधिकृत माहिती दिली. १ जानेवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या नवीन तिमाहीत व्याजदरांमध्ये कोणताही बदल होणार नाही.
advertisement
3/6
म्हणजे गेल्या पावणेदोन वर्षांपासून जे व्याजदर मिळत आहेत, तेच आता मार्च २०२६ पर्यंत लागू राहतील. महागाई वाढत असताना व्याजात थोडी तरी वाढ होईल, अशी अपेक्षा करणाऱ्या पगारदार वर्गाला आणि ज्येष्ठ नागरिकांना यामुळे थोडा धक्का बसला आहे.
advertisement
4/6
लाडक्या लेकीसाठी सुकन्या समृद्धी: जर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत पैसे गुंतवत असाल, तर तुम्हाला आजही ८.२% दराने सर्वाधिक व्याज मिळेल. सरकारी योजनांमध्ये हा अजूनही सर्वात चांगला परतावा मानला जातो.
advertisement
5/6
भविष्य निर्वाह निधीत पैसे टाकणाऱ्यांना ७.१% व्याज मिळेल. टॅक्स वाचवण्यासाठी ही आजही लोकांची पहिली पसंती आहे. पोस्टाची महिन्याची कमाई ज्यांना दरमहा ठराविक उत्पन्न हवं असतं, त्यांना ७.४% व्याज मिळत राहील. किसान विकास पत्राबद्दल बोलायचं झालं तर तुमचे पैसे ११५ महिन्यांत दुप्पट होतील, हा हिशोब सरकारने कायम ठेवला आहे. यासाठी ७.५% व्याज दिले जात आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर ७.७% व्याज मिळणार आहे.
advertisement
6/6
तुम्हाला याचा काय फरक पडणार? सोप्या भाषेत सांगायचं तर, जर तुम्ही नवीन वर्षात व्याजाचे दर वाढतील या आशेने गुंतवणूक थांबवून धरली असेल, तर आता थांबण्यात अर्थ नाही. दर वाढले नसले तरी कमीही झालेले नाहीत, हीच यातली समाधानाची बाब. शेअर बाजारातील चढ-उतार पाहता, आजही सरकारी योजनांमधला हा 'गॅरंटीड' परतावा मध्यमवर्गीयांसाठी सुरक्षित आधार आहे. पुढच्या तीन महिन्यांसाठी तरी तुम्हाला याच दरांवर समाधान मानावं लागणार आहे. आता एप्रिलमध्ये सरकार काय निर्णय घेतं, याकडे सर्वांचं लक्ष असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
नवीन वर्षात स्मॉल सेव्हिंगवर किती मिळणार व्याज? सरकारने घेतलेला मोठा निर्णय, तुमच्या खिशावर होणार परिणाम