एकाजरी डॉक्युमेंटमध्ये असेल घोळ तर रिजेक्ट होईल तुमचं Home Loan, इथे चेक करा संपूर्ण लिस्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
होम लोनसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, सिबिल स्कोअर, सॅलरी स्लिप, ITR, बँक स्टेटमेंट, सेल एग्रीमेंट अशी कागदपत्रं आवश्यक आहेत. सर्व पुरावे योग्य असावेत तरच कर्ज मंजूर होते.
advertisement
1/6

आपल्या हक्काचं घर असावं, असं प्रत्येकालाच वाटतं. मग ते घर घेण्यासाठी पैशांची जमवाजमव, लोनसाठी अर्ज असे अनेक ससेमिरा सुरू असतात. बँक आपल्याला कर्ज तर देते, पण त्याआधी आपल्याकडून ढिगभर कागदपत्र तपासण्यासाठी घेते. त्यामध्ये एक जरी डॉक्युमेंट मिस झालं तर लगेच लोन रिजेक्ट होतं. ही कागदपत्रं जर तुमच्याकडे आधीच तयार असतील, तर कर्जाची प्रक्रिया वेगाने होते आणि विनाकारण फेऱ्या माराव्या लागत नाहीत.
advertisement
2/6
बँक सर्वात आधी तुम्ही कोण आहात, हे तपासते. यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, व्होटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट यांपैकी किमान दोन पुरावे असणं गरजेचं आहे. यावरून तुमची ओळख आणि नागरिकत्व सिद्ध होतं. यामध्ये नाव बदललं, पत्त्याचा घोळ आहे असे प्रकार नसावेत नाहीतर रिजेक्ट होऊ शकतं.
advertisement
3/6
तुमचा सध्याचा पत्ता काय आहे, हे पाहण्यासाठी बँक लाईट बिल, पाणी पट्टी, गॅस बिल किंवा रेशन कार्ड मागू शकते. पासपोर्ट किंवा आधार कार्डचा वापरही पत्त्याचा पुरावा म्हणून करता येतो. हे कागदपत्र तुमच्या घराचा पत्ता अचूक असल्याची खात्री देतात.
advertisement
4/6
तुम्ही होमलोन वेळेत भरू शकता का? हे तपासण्यासाठी बँक काही महत्त्वाच्या गोष्टी पडताळून पाहाते. तुमचा सिबिल स्कोअर, गेल्या ३ ते ६ महिन्यांची सॅलरी स्लिप, फॉर्म १६ आणि गेल्या ३ वर्षांचे 'इन्कम टॅक्स रिटर्न' (ITR) कॉपी. गेल्या ३ वर्षांचे आयटीआर रिटर्न्स, बिझनेसचे कागदपत्र आणि प्रॉफिट-लॉस स्टेटमेंट, या सगळ्या गोष्टी देणं आवश्यक आहे.
advertisement
5/6
बँक स्टेटमेंट आणि मालमत्तेचे कागदपत्र: गेल्या ६ महिने किंवा १ वर्षात तुमच्या खात्यात किती व्यवहार झाले, हे पाहण्यासाठी बँक स्टेटमेंटची प्रत लागते. याशिवाय, तुम्ही जे घर किंवा जागा घेणार आहात, त्याचे सेल एग्रीमेंट, प्रॉपर्टी टॅक्सच्या पावत्या आणि टायटल डीड यांसारखी वैध कागदपत्रं बँकेला द्यावी लागतात.
advertisement
6/6
होम लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी तुमचा सिबिल स्कोअर नक्की तपासून घ्या. जर तुमची कागदपत्रं स्पष्ट आणि कायदेशीररित्या योग्य असतील, तर बँक तातडीने कर्ज मंजूर (Sanction) करते. त्यामुळे कागदपत्रांची फाईल तयार करताना घाई करू नका, शांतपणे सर्व पुरावे गोळा करा आणि मगच बँकेची पायरी चढा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
एकाजरी डॉक्युमेंटमध्ये असेल घोळ तर रिजेक्ट होईल तुमचं Home Loan, इथे चेक करा संपूर्ण लिस्ट