Gold : आपण सोनं खरेदी केल्यावर ज्वेलर्स किती कमावतात? 1 ग्राम सोन्यामागे किती नफा मिळतो?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जर सराफ सोन्याच्या भावाप्रमाणे आपल्याला सोनं देत असेल, वरची जीएसटी सरकारला देत असेल आणि मजूरी ही त्याच्या मजूराला देत असेल, तर यात सराफाचा काय फायदा असेल? तो यामध्ये कसं आणि किती कमावत असेल? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? चला हे गणित समजून घेऊ.
advertisement
1/8

आपल्या भारतीय संस्कृतीत सोनं खरेदी करणं हे केवळ गुंतवणुक म्हणून नाही, तर तो एक आनंदाचा सोहळा असतो. लग्नकार्य असो, सण असो किंवा एखादी छोटी गुंतवणूक, आपण आवर्जून दागिन्यांच्या दुकानात जातो. चकाकणारे दागिने, वातानुकूलित शोरूम आणि समोर मांडलेली सुंदर नक्षीकाम केलेली आभूषणं पाहून आपण भारावून जातो. बिल भरताना आपण सोन्याचा भाव आणि मजुरी बघतो, पण कधी विचार केलाय का की, आपण खरेदी केलेल्या त्या एका छोट्याशा अंगठीवर किंवा चैनवर सराफाला (Jeweller) नक्की किती नफा कमावला असेल?
advertisement
2/8
म्हणजे जर सराफ सोन्याच्या भावाप्रमाणे आपल्याला सोनं देत असेल, वरची जीएसटी सरकारला देत असेल आणि मजूरी ही त्याच्या मजूराला देत असेल, तर यात सराफाचा काय फायदा असेल? तो यामध्ये कसं आणि किती कमावत असेल? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? चला हे गणित समजून घेऊ.
advertisement
3/8
सोन्याचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. 1 एप्रिल 2026 च्या आकडेवारीनुसार 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम सुमारे 13,836 रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. अशा वेळी सामान्य ग्राहकाला पडणारा हा प्रश्न अत्यंत रास्त आहे. चला तर मग, आज सराफांच्या या व्यवसायातील नफ्याचं गणित उलगडून पाहूया.
advertisement
4/8
1. 'मेकिंग चार्जेस' (मजुरी): नफ्याचा मुख्य स्त्रोततुम्ही जेव्हा दागिना खरेदी करता, तेव्हा सोन्याच्या मूळ किमतीवर मेकिंग चार्जेस लावले जातात. हे चार्जेस 5% पासून 25% पर्यंत असू शकतात. दागिना जितका नाजूक आणि नक्षीकाम केलेला, तितकी मजुरी जास्त. ही मजुरी म्हणजे केवळ कारागिराचा पगार नसून, त्यामध्ये सराफाचा मोठा नफा दडलेला असतो. साध्या चैनसाठी मजुरी कमी लागते, पण अँटिक हार किंवा जड बांगड्यांसाठी ती खूप जास्त असते.
advertisement
5/8
2. स्प्रेड किंवा खरेदी-विक्रीतील फरकसराफ व्यवसायात स्प्रेड नावाचा एक प्रकार असतो. सराफ ज्या भावाने सोने खरेदी करतात आणि ज्या भावाने ग्राहकाला विकतात, यात थोडा फरक असतो. समजा, त्यांनी बाजारभावापेक्षा थोड्या कमी किमतीत सोने घेतले असेल, तर ते ग्राहकाला त्या दिवसाच्या चालू बाजारभावानेच विकतात. हाच फरक त्यांचा हिडन प्रॉफिट (लपलेला नफा) असतो. म्हणूनच जेव्हा आपण जुने सोने विकायला जातो, तेव्हा आपल्याला चालू भावापेक्षा थोडा कमी दर मिळतो.
advertisement
6/8
3. 1 ग्रॅम सोन्यामागे नक्की किती उरतात?आजच्या बाजारभावानुसार आणि सर्व गणिते मांडली, तर 1 ग्रॅम सोन्याची विक्री केल्यावर एका सराफाला 800 ते 1500 रुपयांपर्यंत नफा होऊ शकतो. जर तुम्ही 10 ग्रॅमचा एखादा दागिना घेतला, तर सराफाच्या गल्ल्यात साधारणपणे 8 ते 15 हजार रुपये नफा जमा होतो.
advertisement
7/8
4. दिसतो तितका नफा 'शुद्ध' नसतोप्रति ग्रॅम 1,500 रुपये नफा ऐकायला खूप मोठा वाटत असला, तरी हा त्यांचा 'निव्वळ नफा' (Net Profit) नसतो. मोठ्या शोरूमचं भाडं, सेल्समनचा पगार, एसी आणि विजेचं बिल, सुरक्षेसाठी असलेले गार्ड्स, जीएसटी आणि इतर सरकारी कर या सगळ्यांचा खर्च या नफ्यातूनच भागवावा लागतो. हे सर्व खर्च वजा जाता जो उरतो, तो त्यांचा खरा नफा असतो.
advertisement
8/8
5. दरवाढीचा फटका कारागिरांनासोन्याचे भाव सतत वाढत असल्यामुळे सामान्य माणसाने सोने खरेदीत मोठी कपात केली आहे. याचा थेट परिणाम सोन्याच्या व्यवसायावर झाला आहे आणि जे कारागीर रोजंदारीवर दागिने घडवतात, त्यांच्यावर आज बेरोजगारीची वेळ आली आहे. शोरूममध्ये गर्दी असली तरी प्रत्यक्ष विक्री कमी होत असल्याने या क्षेत्रातील समीकरणे वेगाने बदलत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold : आपण सोनं खरेदी केल्यावर ज्वेलर्स किती कमावतात? 1 ग्राम सोन्यामागे किती नफा मिळतो?