TRENDING:

एक लिटर पेट्रोलवर पंप मालकाला किती नफा मिळतो? कमाई पाहून व्हाल थक्क

Last Updated:
Petrol Rate : पेट्रोल की कीमतें अलग-अलग जगहों पर अलग-अलग होती हैं. शहरों, गांवों और हाईवे पर बने पंपों के कमीशन में भी फर्क होता है.
advertisement
1/8
एक लिटर पेट्रोलवर पंप मालकाला किती नफा मिळतो? कमाई पाहून व्हाल थक्क
अमेरिका-इस्रायल तणाव वाढतोय. जगभरातच तणावाचं वातावरण निर्माण झालंय. अशामध्ये चर्चा सुरू आहे की, एलपीजीसह पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. याच कारणामुळे आता पेट्रोलपंपावरही रांगा लागायला लागल्या आहेत.
advertisement
2/8
अशाप्रकारच्या अफवा पसरल्या किंवा चर्चा रंगायला लागल्या की, मग लोक पेट्रोलपंपावर गर्दी करू लागतात. लोक गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्यास सुरूवात करतात. खरं पाहायचं झालं तर त्या विशिष्ट वस्तूची कमतरता नसतानाही लोकांनी असं केल्याने कृत्रिम टंचाई निर्माण होते. मात्र आता तेल कंपन्यांनी सरकारमार्फत स्पष्ट केलंय की, पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नाही.
advertisement
3/8
भारतामध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची सख्या ही सातत्याने वाढताना दिसतेय. मात्र पेट्रोल-डिझेलही मागणीही प्रचंड आहे. त्यात काहीच कमतरता आलेली नाही. देशातील सर्वाधिक लोक हे आजही पेट्रोल-डिझेलवरच अवलंबून आहेत.
advertisement
4/8
भारतामध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती या फक्त कच्च्या तेलावर अवलंबून नसतात. तर त्यावर लागणारे टॅक्सही महत्त्वाची भूमिका बजावतात. पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळे टॅक्स लावतात. यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये इंधनाच्या किंमती कमी-जास्त असतात.
advertisement
5/8
पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या तर त्या फक्त तेवढ्यापुरत्या मर्यादित राहत नाहीत. तर मग प्रवास खर्च वाढतो. यासोबतच विविध दैनंदिन वापराच्या वस्तू रोज विविध ठिकाणांहून आयात होत असल्याने खाण्या-पिण्याच्या वस्तुच्याही किंमतीत वाढतात. पण असं असताना पेट्रलोपंप मालकाला एक लिटर पेट्रोलमागे किती नफा मिळतो हे तुम्हाला माहितीये का?
advertisement
6/8
सरकारी एजेंसी पेट्रोलियम प्लानिंग अँड एनालिसिस सेल (PPAC)नुसार, डिसेंबर 2024 पासून पेट्रोल पंप डिलर्सचे कमीशन ठरवण्यात आले आहे. या अंतर्गत पेट्रोलवर जवलपास 3,144.03 रुपये प्रति किलोलीटर आणि डिझेलवर 2,332.51 प्रति किलोलीटरचं बेस कमीशन मिळतं. यासोबतच उत्पादनाचा काही टक्के भागही यात जोडला जातो. आता प्रति लिटरमध्ये जाणून घेऊया. पेट्रोलवर जवळपास 3.14 रुपये आणि डिझेलवर जवळपास 2.33 रुपयांचा बेस कमिशन मिळतो. ज्यावर काही टक्के भाग हा वेगळा जोडला जातो.
advertisement
7/8
पेट्रोलच्या किंमती जशा कमी जास्त होतात. तसंच पेट्रोल पंप डिलरर्सचं हे कमीशनही वेळोवेळी वाढत राहते सुरुवातीला ही रक्कम खुप कमी होते. मात्र वर्षानुवर्षे यात हळुहळू वाढ होत गेली. ऑक्टोबर 2024 मध्ये जवळपास आठ वर्षांनंतर कमीशनमध्ये उल्लेखनीय वाढ झाली होती. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या (इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम) ने संयुक्तरित्या याची घोषणा केली होती. इंट्रेस्टिंग गोष्ट म्हणजे, या वाढीचं ओझं ग्राहकांवर टाकण्यात आलं नाही आणि किरकोळ किमतींमध्ये कोणतीही अतिरिक्त वाढ झाली नाही.
advertisement
8/8
कमीशनसोबतच पेट्रोलपंप मालकांना इतर मार्गांनेही कमाई होते. यामध्ये लायसेन्स फीस रिकव्हरी आणि काही इंसेटिव्ह योजनांचा समावेश आहे. ज्या विक्रीच्या स्तरावर आणि पंपाच्या प्रकारावर अवलंबून असते. शहर, गाव किंवा हायवेवर असलेल्या पंपाची विक्री ही वेगवेगळी असते. यासाठी खऱी कमाईही त्या हिशोबाने बदलत असते. सामान्यतः कोणत्याही पेट्रोलपंपावर फ्यूल विक्रीतून रोज 15,000 ते 60,000 रुपयांपर्यंत कमिशन होऊ शकते. मात्र हे पूर्ण विक्रीचे प्रमाण स्थानिक परिस्थितींवर अवलंबून असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
एक लिटर पेट्रोलवर पंप मालकाला किती नफा मिळतो? कमाई पाहून व्हाल थक्क
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल