Real Estate : स्वप्नातलं Best घर कसं निवडायचं? विकत घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, भविष्यात येणार नाही अडचण
- Published by:Devika Shinde
Last Updated:
How to Choose Best House : घर खरेदी केल्यानंतर झालेली छोटीशी चूकही पुढे मोठं डोकेदुखीचं कारण बनू शकते. त्यामुळे आजच्या काळात, जिथे प्रॉपर्टीच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत, तिथे घर खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींचा नीट विचार करणं अत्यावश्यक आहे.
advertisement
1/6

स्वतःचं घर असणं हा प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं. अनेक जण वर्षानुवर्षं मेहनत करून, बचत करून त्या "आपल्या घराच्या" स्वप्नासाठी प्रयत्न करत असतात. पण हे स्वप्न साकार करताना केवळ उत्साह पुरेसा नसतो; योग्य माहिती आणि विचारपूर्वक निर्णय घेणं तितकंच गरजेचं असतं. कारण एकदा घर खरेदी केल्यानंतर झालेली छोटीशी चूकही पुढे मोठं डोकेदुखीचं कारण बनू शकते. त्यामुळे आजच्या काळात, जिथे प्रॉपर्टीच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत, तिथे घर खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींचा नीट विचार करणं अत्यावश्यक आहे.
advertisement
2/6
1. योग्य लोकेशनची निवडघर खरेदी करताना लोकेशन हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. तुमचं घर शाळा, हॉस्पिटल, मार्केट आणि ऑफिसपासून जवळ असेल तर दैनंदिन प्रवास सोपा होतो. त्याचबरोबर, चांगली कनेक्टिव्हिटी असलेलं ठिकाण भविष्यात तुमच्या मालमत्तेची किंमतही वाढवतं. म्हणून लोकेशन निवडताना फक्त सध्याची सोय नाही तर पुढील काही वर्षांचा विचार करून निर्णय घ्या.
advertisement
3/6
2. बजेट ठरवा आणि आर्थिक नियोजन कराघर घेण्यापूर्वी तुमचं उत्पन्न, बचत आणि खर्चानुसार बजेट निश्चित करणं गरजेचं आहे. घर खरेदी ही मोठी गुंतवणूक असल्याने त्यात घाई करणं टाळा.ईएमआय (EMI), प्रॉपर्टी टॅक्स, मेंटेनन्स चार्जेस यांसारखे खर्च लक्षात घेऊनच अंतिम निर्णय घ्या. यामुळे भविष्यात तुमच्यावर आर्थिक ताण येणार नाही आणि तुमचं स्वप्न आर्थिक दृष्ट्या सुरक्षित राहील.
advertisement
4/6
3. सर्व कागदपत्रांची नीट तपासणी कराघर फाइनल करण्यापूर्वी रजिस्ट्रेशन पेपर, NOC, आणि लोन क्लिअरन्स अशा सर्व कागदपत्रांची पडताळणी करणे अत्यंत आवश्यक आहे.यासाठी अनुभवी वकिलाचा सल्ला घ्या. काहीवेळा प्रॉपर्टीशी संबंधित कायदेशीर गुंतागुंत कागदपत्रांमध्ये लपलेली असते, जी सामान्य माणसाला लक्षात येत नाही. पण वकील या गोष्टी सहज ओळखू शकतो.
advertisement
5/6
4. बिल्डरची विश्वासार्हता तपासातुम्ही ज्या बिल्डर कडून घर घेत आहात, त्याचा पूर्वीचा ट्रॅक रेकॉर्ड, प्रोजेक्टची गुणवत्ता आणि बाजारातील प्रतिष्ठा तपासणं महत्त्वाचं आहे. ऑनलाइन रिव्ह्यू, ग्राहकांच्या प्रतिक्रिया आणि पूर्ण झालेल्या प्रोजेक्ट्सची माहिती यावरून बिल्डरबद्दल योग्य अंदाज येतो. विश्वसनीय बिल्डरकडून घेतलेली मालमत्ता भविष्यात सुरक्षित गुंतवणूक ठरते.
advertisement
6/6
स्वतःचं घर म्हणजे केवळ एक बांधकाम नव्ह. ती आपल्या मेहनतीची, स्वप्नांची आणि सुरक्षित भविष्यातील गुंतवणुकीची खूण असते. म्हणून निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक गोष्ट तपासून, समजून आणि विचारपूर्वक पुढे पाऊल टाका.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Real Estate : स्वप्नातलं Best घर कसं निवडायचं? विकत घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, भविष्यात येणार नाही अडचण